शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By admin | Updated: June 5, 2017 00:39 IST

नरभक्षक वाघाने आपले बस्तान आता देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील गावांमध्ये मांडले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा,..

कोंढाळा ग्रामपंचायततर्फे निवेदन : खरीप हंगाम बुडण्याचा निर्माण झाला आहे धोकालोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : नरभक्षक वाघाने आपले बस्तान आता देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील गावांमध्ये मांडले आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामपंचायत कोंढाळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आरमोरी व देसाईगंज तालुक्याच्या सीमेवरील रवी, अरसोडा, उसेगाव, कोंढाळा या गावांमध्ये दोन महिन्यांपासून वाघ आढळून येत आहे. कोंढाळा येथील लव्हा कुक्षी मेश्राम व रवी येथील मरप्पा या दोन शेतकऱ्यांवर नरभक्षक वाघाने हल्ला केला. पावसाळी शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र वाघाच्या दहशतीने शेतकरी शेतीमध्ये जाण्यास घाबरत आहेत. पावसाळ्यापर्यंत वाघ जंगलातच राहिल्यास शेतीचा हंगाम बुडण्याची शक्यता आहे. वाघाच्या दहशतीमुळे या परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. सदर नरभक्षक वाघाला जेरबंद करणे आवश्यक आहे. नरभक्षक वाघासाठी पिंजरा मांडण्यात आला आहे. मात्र अजूनपर्यंत वाघ पिंजऱ्यात सापडला नाही. शार्प शुटरच्या मदतीने वाघ पकडण्याचे प्रयत्न झाले. मात्र वाघाने शार्प शुटरलाही हुलकावणी दिली. वन विभागाने कोणत्याही परिस्थिती वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी उपवनसंरक्षक होशींग यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोशनी पारधी, कोंढाळाच्या सरपंच मंगला प्रकाश शेंडे, उपसरपंच गजानन राऊत, कैलाश राणे, पंढरी नखाते, गजानन सेलोटे, सुनिल पारधी यांच्यासह कोंढाळा तसेच परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक सुध्दा उपस्थित होते.