शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीत समस्यांची नोंद आता अ‍ॅपने

By admin | Updated: July 8, 2017 01:14 IST

चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे, या हेतूने नगर पंचायतीने

नगर पंचायतीचा पुढाकार : स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालकांच्या हस्ते उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण व्हावे, या हेतूने नगर पंचायतीने नागरिकांसाठी तक्रार अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपचे उद्घाटन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रशासन अधिकारी गजानन भोयर, गडचिरोलीचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, चामोर्शी न. पं. च्या मुख्याधिकारी आर्शिया जुही, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, न. पं. सभापती विजय शातलवार, नगरसेवक प्रशांत येगलोपवार, रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे, रोशनी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, विजय गेडाम उपस्थित होते. तक्रार अ‍ॅप सुरू करणारी चामोर्शी नगर पंचायत जिल्ह्यातील पहिली नगर पंचायत आहे, असे प्रतिपादन करीत पुढील ४०-५० वर्षांचा विचार करून येथे कचरा डेपोेसाठी जागा सूचवून प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांनी दिले. अ‍ॅपमुळे समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. चामोर्शीतील स्वच्छता अभियानाची पाहणी स्वच्छ महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत जे उपक्रम राज्यात राबविले जात आहेत, यापैकी कोणते उपक्रम चामोर्शी नगर पंचायतीने राबविले, याची स्वच्छ महाराष्ट्र अभियान मुंबईचे संचालक डॉ. उदय टेकाडे यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. चामोर्शी शहरातील सार्वजनिक शौचालय, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बांधले जात असलेले खासगी १ हजार ७०० शौचालय आदींची पाहणी डॉ. उदय टेकाडे यांनी केली व शौचालय बांधकामाबाबत समाधान व्यक्त केले. चमूमध्ये गडचिरोलीचे जिल्हा प्रशासन अधिकारी गजानन भोयर, गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांचा समावेश होता. स्वच्छता अभियानाच्या पाहणीप्रसंगी नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहुल नैताम, मुख्याधिकारी आर्शिया जुही, न. पं. सभापती विजय शातलवार, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, वैभव भिवापुरे, प्रशांत येगलोपवार, रोशनी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, विजय गेडाम व नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.