शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाइन वर्कर जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

या बैठकीत सुरुवातीला कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राज्य सरचिटणीस बालाजी ...

या बैठकीत सुरुवातीला कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर राज्य सरचिटणीस बालाजी पवार यांनी राज्यातील जिल्ह्यानुसार कोरोना बाधित व कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांची तसेच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणींविषयी सांगितले. तसेच कोरोनामुळे किती नुकसान झाले आहे त्याची माहिती दिली. शासनाला किंवा व्यवस्थापनांना मागणी करताना ही माहिती आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले. कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनीही विचार व्यक्त केले.

जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना लस उपलब्ध करावी, बाधित व सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटित कामगार म्हणून आर्थिक मदत मिळावी, असंघटित कामगार म्हणून लवकरात लवकर नोंदणी सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री व आरोग्य मंत्री यांना देण्याचे ठरविण्यात आले. सभेचे आभार सरचिटणीस बालाजी पवार यांनी मानले. उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप, संघटन सचिव रवींद्र कुलकर्णी, शिवाजी खेडकर, कोकण विभाग निमंत्रक प्रभारी दत्ता घाडगे, सदस्य राजू टिकार, मनीष राजनकर, जगदीश उमरदंड, भारत माळवे, दत्ता ठाकरे, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, मनीष वासनिक, सूर्यकांत टेंबे, महेश कुलथे, रवींद्र कांबळे, किशोर सोनवणे, आदी सहभागी झाले.

बाॅक्स

मृत्यू झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत द्या

कोरोनामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी, कोरोनाची लस उपलब्ध करून दिली पाहिजे, निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, बाधितांना मदत करावी, अशा प्रकारे अनेक मागण्या पुढे आल्या. यावर राज्य संघटनेच्या वतीने काही व्यवस्थापनाकडे निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विनंती केल्याची माहिती सरचिटणीस बालाजी पवार यांनी दिली. व्यवस्थापनाकडून सकारात्मक विचार होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.