शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 21, 2015 01:25 IST

आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी.

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना निवेदन : तालुका काँग्रेसचे शिष्टमंडळ तहसीलदारांना भेटलेआरमोरी : आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रती एकर २५ हजार रूपये नुकसान भरपाई चार हेक्टरपर्यंत देण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार आनंदराव गेडाम, ज्येष्ठ नेते रवींद्र दरेकर, तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी यांनी केले.शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी तालुका काँग्रेसच्या वतीने तहसीलदार वलथरे यांना घेराव घालण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरी तालुक्यात यंदा खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे १०० टक्के रोवणी होऊ शकले नाही. ज्या शेतकऱ्यांनी धानपिकाची रोवणी केली त्या शेतकऱ्यांचे धानपीक पावसाअभावी करपले. तर काही शेतकऱ्यांच्या धानपिकावर गादमाशी, तुडतुडा, खोडकिडा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे यंदा धानाचे उत्पादन प्रचंड घटणार आहे. महिनाभरापासून पाऊस नसल्याने हजार हेक्टर शेतामधील धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटाता सापडला आहे. आरमोरी तालुक्यात धानपीकाची आणेवारी ४० टक्क्याच्या आत आहे. मात्र सर्वे योग्यरित्या करण्यात आला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी माजी जि.प. सभापती आनंदराव आकरे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजू गारोदे, अशोक वाकडे, बग्गु ताडाम, मिलिंद खोब्रागडे, सुभाष सपाटे, श्रीनिवास आबंटवार, चंदू वडपल्लीवार, रघुनाथ मोगरकर, अनिल सोमनकर, दिलीप घोडाम, वघाळाच्या सरपंच मनिषा दोनाडकर, यज्ञकला ठवरे, नरेश टेंभुणे, खेमराज दामले, प्रभाकर टेंभुर्णे, भोलेनाथ धानोरकर, निलकंठ गोहणे, प्रविण राहाटे, यशवंत लोणारे, बेबी सोरते व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)