लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करून पाच जनावरांना ठार मारल्याची घटना बुधवार ३ जुलै रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.चुरचुरा येथील गावाला लागूनच असलेल्या जंगलात चरावयास गेलेल्या यशवंत उरकुडे यांच्या मालकीचा एक गोºहा व एक गाय, गजानन शिवणकर यांचा एक गोऱ्हा, अशोक पेंदाम यांचा एक बैल तर कवडू म्हशाखेत्री यांच्या मालकीच्या एका गायीला वाघाने ठार केले. घटनास्थळावर वाघाच्या पायांचे ठसे आढळून आल्याने वाघानेच पाचही जनावरांना ठार केल्याचे स्पष्ट होत आहे.जनावर मालकांचे एकूण ६८ हजारांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी ईश्वर गेडाम, नितीन गेडाम यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. गुरूवारी ४ जुलै रोजी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. एफ. विवरेकर, सहाय्यक उपवनसंरक्षक घोंगडे, वनपरिक्षेत्राधिकारी चांगले, क्षेत्र सहाय्यक बोरावार यांनी घटनास्थळला भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक गडपायले यांनी दिली. कॅमेरातील चित्रांवरून पुढची कार्यवाही केली जाणार आहे.
वाघाच्या हल्ल्यात जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:48 IST
तालुक्यातील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करून पाच जनावरांना ठार मारल्याची घटना बुधवार ३ जुलै रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघाच्या हल्ल्यात जनावरे ठार
ठळक मुद्देचुरचुरा जंगलातील घटना : परिसरात कॅमेरे लावणार