शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संतप्त जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 00:52 IST

जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांना कामातून डावलून नव्या फवारणी कर्मचाऱ्यांची भरती करून प्रशासनाने अन्याय केला.

कामातून कर्मचाऱ्यांना वगळले : पदाधिकाऱ्यांचा प्रशासनावर आरोपगडचिरोली : जुन्या फवारणी कर्मचाऱ्यांना कामातून डावलून नव्या फवारणी कर्मचाऱ्यांची भरती करून प्रशासनाने अन्याय केला. त्यामुळे उपासमारीची पाळी कामगारांवर आली. कामगारांना पुन्हा कामावर सामावून घ्यावे या मागणीसाठी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या बॅनरखाली जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा हिवताप अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या निकाली न काढल्यास साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला होता. मात्र जुन्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारला देविदास कुकडे, गजानन कोठारे, नक्टूजी भुरसे, लीलाधर सोमनकर, भाऊजी किरमे, आदी पाच फवारणी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. या उपोषण मंडपात संघटनेचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष उमेश कंदीकुरवार, अनिल वासेकर, राजू मोगरे, नेवाजी वालदे, मणिराम चंदनमल्लवार, विजय गोरेड्डीवार, काशिनाथ भांडेकर, जयंत टिकले, राजू सोमनकार, दौलत कोंडागुर्ले, महादेव करमरकर, राहूल लाडे, मोरेश्वर बारसागडे, माधव दुर्गे, ज्ञानेश्वर सोनुले, मुखरू मुनघाटे, दामोधर मुनघाटे, लोमेश उंदीरवाडे, सुनिलाल सहारे आदी हंगामी फवारणी कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)नव्या ८३९ कर्मचाऱ्यांची पदभरती रद्द कराजुन्या हंगामी फवारणी कामगारांना डावलून नवीन ८३९ कर्मचाऱ्यांची केलेली पदभरती रद्द करावी, फवारणी कामगारांना ११ महिन्यांचे काम देण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, आरोग्य सेवक पुरूष वर्ग ३ व वर्ग ४ यांचे सरळसेवेने समावेशन करण्यात यावे, प्रथम नियुक्तीचे दिनांक लक्षात घेऊन सेवेत सामावून घ्यावे, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाले. त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी.