लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, आमदारांनी शासनाकडे अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, असे निवेदन महाराष्टÑ राज्य अंगणवाडी, बालवाडी (आयटक) कर्मचारी युनियनने आ. कृष्णा गजबे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मानधनात वाढ करावी, टीएचआर बंद करून अंगणवाडी शिजलेला आहार बालकांना देण्यात यावा आदी मागण्यांसाठी ११ सप्टेंबरपासून आंदोलन केले जात आहे. सरकारसोबतची ही आरपारची लढाई असल्याने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे लावून धरू, असे आश्वासन आमदारांनी दिले. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष लता मडावी, बसंती अंबादे, उषा शेंडे, बेबीनंदा आडे, अनुरथा लाडे, मंदा शेंडे उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:33 IST
अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, आमदारांनी शासनाकडे अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, ....
अंगणवाडी कर्मचाºयांचा संप सुरूच
ठळक मुद्देआमदारांना निवेदन : मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन