शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिला कर्मचारी आक्रमक

By admin | Updated: March 23, 2017 00:52 IST

मानधन वाढ व बोनसच्या मुद्यावर जिल्हाभरातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकच्या बॅनरखाली मुक्काम आंदोलन केले.

शासन व प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी : जिल्हा परिषदेसमोर आंदोलनगडचिरोली : मानधन वाढ व बोनसच्या मुद्यावर जिल्हाभरातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन बुधवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकच्या बॅनरखाली मुक्काम आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार व विनोद झोडगे यांनी केले. शासन निर्णयाप्रमाणे गठित केलेल्या मानधन वाढ समितीने ९ मार्च २०१७ रोजी शासनाला मानधन वाढीचा प्रस्ताव सादर केला. प्रधान सचिवांनी सादर केलेल्या अहवालाप्रमाणे मानधनवाढ व दिवाळी बोनसकरिता १८ मार्च रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली नाही. यामुळे आयटक पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने १० मार्च रोजी मुंबई येथील विधानसभेवर विशाल मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली नाही. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत, असा आरोप भाषणातून डॉ. महेश कोपुलवार, विनोद झोडगे, देवराव चवळे आदींनी केला.या मुक्कामी आंदोलनात संघटनेच्या पदाधिकारी राधाबाई ठाकरे, कौशल्या गोंधोळे, मिरा कुरंजेकर, शशिकला धात्रक, सपना रामटेके, मीनाक्षी झोडे, कांता फटिंग, दुर्गा पुर्वे, अनिता अधिकारी, शिवलता बावनथडे, बसंती अंबादे, ज्योती कोमलवार, जहारा शेख, रूपा पेंदाम, जायशा शेख, ज्योती कोल्हापुरे, रेखा जांभुळे, लता मडावी, यशोदा दहागावकर आदी उपस्थित होत्या.