शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अन् रानडुक्कर शिरले शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 01:31 IST

नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कनेरी-राम येथील जिल्हा परिषद शाळेत एक रानडुक्कर शिरले.

एक शिक्षक जखमी : मोठी दुर्घटना टळलीसडक-अर्जुनी : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कनेरी-राम येथील जिल्हा परिषद शाळेत एक रानडुक्कर शिरले. यात एक शिक्षक जखमी झाला. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ही घटना गुरूवार (दि.२०) सकाळी ८.१० वाजता घडली.सकाळच्या पाळीत शाळा सुरू असताना विद्यार्थी प्राणायामाचे धडे गिरवित होते. त्याचवेळी अचानक रानडुक्कर शाळेच्या आवारात घुसले. मुलांच्या अंगावरून उडी मारून शाळेच्या आवारात धावू लागले. विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून वर्गशिक्षकांनी वर्गाचे दार बंद केले. त्या रानडुकराला सुरक्षाभिंतीच्या बाहेर काढण्यासाठी शिक्षक मधुकर विश्वनाथ येरणे व गावकरी भागवत तिमाजी तरोणे प्रयत्न करीत होते. मात्र रानडुकराने त्यांना धक्का दिला. यात येरणे जखमी झाले तर भागवत यांच्या पायाला दुखापत झाली. रानडुकर वर्गखोलीत शिरला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. पण कनेरीचे उपसरपंच प्रेमलाल मेंढे, गावकरी व शिक्षकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. गावकरी त्या रानडुकराला बाहेर जंगलात पळविण्यासाठी लागले असताना ते सुरक्षाभिंतीवरून उडी मारून पळून गेले. वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, वनक्षेत्र सहायक गौतम, वनरक्षक पटले यांनी चौकशी केली.(शहर प्रतिनिधी)