शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

किराणा महागला तरी शहरात भाेजनाचे दर सध्या स्थिरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाले आहे. सरकारने खाद्यतेल व किराणा साहित्याच्या किमती येत्या काही दिवसांत कमी न केल्यास नाईलाजास्तव आम्हांला शाकाहारी व मांसाहारी भाेजनाच्या दरात वाढ करावी लागेल. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हा मुख्यालयासह तालुकास्थळी छाेटी-माेठी अनेक हाॅटेल व भाेजनालये आहेत. भाेजनालयात जाऊन भाेजन करणाऱ्यांची संख्या शहरात कमी नाही. खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर गेल्या दाेन ते तीन महिन्यांत प्रचंड वाढले आहेत. शिवाय पेट्राेल, डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. याचा परिणाम हाॅटेल व भाेजनालय व्यवसायावर झाला आहे. असे असले तरी सध्या तरी गडचिराेली शहरासह जिल्ह्यातील भाेजनाचे दर स्थिर आहेत.शहरातील हाॅटेलमध्ये शाकाहारी व मांसाहारी भाेजनाची व्यवस्था आहे. काही हाॅटेल १०० टक्के शाकाहारी आहेत. तर बऱ्याच हाॅटेलमध्ये दाेन्ही प्रकारचे भाेजन नागरिकांना उपलब्ध हाेत असते. घरचे कुटुंबीय बाहेरगावी गेल्यानंतर संबंधित नागरिक हाॅटेल अर्थात भाेजनालयात जाऊन आपली भूक भागवितात. तसेच सामूहिक भाेजनासाठी हाॅटेलमध्ये जातात.

७० ते १३० रुपयांना मिळते साधी थाळी-   फुटपाथवरील दुकानात भाजी, पाेळी, वरण, भात मिळून ७० रुपयाला पाेटभर जेवण मिळते. -    माेठ्या हाॅटेलमध्ये वरील सर्व साहित्यासह पापड, लाेणचे उपलब्ध केले जाते. या भाेजनाच्या थाळीचा दर १०० रुपये आहे.-   शाकाहारी भाेजनात गाेड पदार्थ मागविल्यास ही थाळी १३० रुपयाला पडते. -   भाेजनालयामध्ये मासिक भाेजनाचीही व्यवस्था आहे. पदार्थानुसार व तेथील साेयीनुसार शहरात भाेजनाचे पैसे संबंधित ग्राहकाकडून घेतले जातात.

गुणवत्ता व साेयीनुसार माेजावे लागतात पैसेगडचिराेली शहरात फुटपाथवरील छाेट्या हाॅटेलांसह माेठे हाॅटेल व भाेजनालय आहे. या भाेजनालयात गुणवत्ता व साेयीनुसार ग्राहकांना भाेजनासाठी पैसे माेजावे लागतात.साेयीसुविधायुक्त व गुणवत्ता असलेल्या हाॅटेलमध्ये एका माणसाला मांसाहारी भाेजनासाठी ३०० ते ४०० रुपये लागतात. यात नवीन वर्षात वाढ झाल्यास एकाला ५०० रुपये भाेजनासाठी माेजावे लागणार आहेत. 

काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाले आहे. सरकारने खाद्यतेल व किराणा साहित्याच्या किमती येत्या काही दिवसांत कमी न केल्यास नाईलाजास्तव आम्हांला शाकाहारी व मांसाहारी भाेजनाच्या दरात वाढ करावी लागेल. - चंद्रकांत पतरंगे, अध्यक्ष, हाॅटेल असाेसिएशन, गडचिराेली 

आमच्याकडे दीड वर्षापूर्वी भाेजनाच्या दरात वाढ करण्यात आली हाेती. आता १९०० रुपयाला मिळणारे तेलाचे पिंप २२०० रुपयांचे झाले आहे. तेवढे पैसे माेजून आम्हांला तेल आणावे लागत आहे. याशिवाय भाेजन तयार करण्यासाठी लागणारे विविध साहित्य व किराणा मालाच्या किमती वाढल्या आहेत. सध्या भाेजनाच्या दरात वाढ झाली नसली तरी सरकारकडून तत्सम साहित्याची दरवाढ कमी न झाल्यास नवीन वर्षात भाेजनाच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. डिझेल, पेट्राेल दरवाढीचा परिणामही किराणा साहित्याच्या किमतीवर झाला आहे.- पवन सुचक, हाॅटेल व्यावसायिक, गडचिराेली

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल