शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप

By admin | Updated: January 15, 2017 01:37 IST

नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे तालुक्यातील शिवणी येथे आर्थिक साक्षरता

शिवणीत साक्षरता मेळावा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम गडचिरोली : नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे तालुक्यातील शिवणी येथे आर्थिक साक्षरता केंद्रांमार्फत डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती मेळावा शुक्रवारी घेण्यात आला. या मेळाव्यात बँकेतर्फे खातेदारांना रूपे एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे संचालक डॉ. बळवंत लाकडे, विकास विभागाचे सहायक व्यवस्थापक आर. वाय. सोरते, कनेरीच्या सरपंच विना मडावी, जिल्हा बँकेचे अधिकारी के. के. साखरे, गडचिरोली शाखेचे निरिक्षक एम. डी. रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केलेल्या नोटबंदीच्या घोषणेनुसार व भारतातील बँकेच्या ग्राहकांनी कॅशलेसचा वापर करण्याच्या उद्देशाने शिवणी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती मेळावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी मान्यवरांनी एटीएम कार्डाचा वापर कशा पध्दतीने करावा, आधार कार्ड क्रमांकाचे महत्त्व, बँकेच्या बचत खात्याशी आधार क्रमांक व मोबाईल नंबर संलग्नित करणे आदी विषयांवर चित्रफीतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक डॉ. बळवंत लाकडे यांच्या हस्ते बँक खातेदारांना एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. ग्राहकांनी कॅशलेसचा वापर वाढवावा, असे आवाहन डॉ. लाकडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)