शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आलदंडीत नवे पोलीस ठाणे उभारले

By admin | Updated: April 23, 2017 01:26 IST

एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी

अतिसंवेदनशील भाग : नक्षलवाद्यांना शह देण्याचा उद्देश एटापल्ली : एटापल्ली पोलीस उपविभागाअंतर्गत अतिसंवेदनशील व नक्षल प्रभावित असलेल्या आलदंडी येथे २२ एप्रिल रोजी शनिवारला नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. जनतेचे संरक्षण करणे व नक्षली कारवायांना आळा घालण्यासाठी एटापल्लीपासून १० किमी अंतरावर असलेल्या आलदंडी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. आलदंडी गाव व परिसरातील ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते आलदंडी येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. तसेच पोलीस मदत केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाकरिता प्रस्तावित जागेवर भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्ताने आलदंडी येथे पोलीस विभागातर्फे जनजागरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच उपस्थित महिलांना साडी व पुरूषांना ड्रेस तसेच शेतकऱ्यांनी शेतीपयोगी साहित्य आणि युवकांना खेळाच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, पोलीस उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार, एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव, सीआरपीएफच्या १९१ बटालियनचे कमांडर त्रिपाठी, आलदंडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी योगेश दाभाडे आदींसह पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. याच महिन्यात मागील आठवड्यात पोलीस प्रशासनाने एटापल्ली-अहेरी मार्गावर येलचिल येथे नवे पोलीस मदत केंद्र स्थापन केले. या नव्या मदत केंद्रांमुळे नक्षली कारवायांवर नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठे यश येण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागात पोलीस ठाण्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)