शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी रूग्णालयाची आरोग्य सेवा अस्थिपंजर

By admin | Updated: August 14, 2016 01:39 IST

अहेरी उपविभागातील पाच तालुक्याच्या लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार असलेल्या अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून ....

रूग्णांची हेळसांड : उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचा परिणाम ए. आर. खान अहेरी अहेरी उपविभागातील पाच तालुक्याच्या लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार असलेल्या अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने या रूग्णालयाची आरोग्य सेवा पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. परिणामी रूग्णांची प्रचंड हेळसांड होत असून औषधोपचारासाठी या भागातील गरीब रूग्णांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे अहेरी येथे निवासस्थान आहे. मात्र शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे त्यांच्याच क्षेत्रात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहेत. अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व अहेरी या पाच तालुक्यातील हजारोच्या संख्येने रूग्ण दररोज अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात औषधोपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात अद्यापही अतिदक्षता केंद्र सुरू करण्यात आले नाही. या रूग्णालयात सद्य:स्थितीत एक वैद्यकीय अधीक्षक, दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असून अलिकडेच एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या रूग्णालयाला जवळपास १० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा प्रचंड प्रभावित होत आहे. मात्र याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. गेल्या दोन वर्षापूर्वीपासून आरोग्य उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्यामार्फत आरोग्य सेवा मुख्य संचालक मुंबई, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी गडचिरोली आदींना वेळोवेळी पत्राद्वारे पाठपुरावा करून येथील रिक्तपदे भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र पद भरतीची बाब अद्यापही दुर्लक्षितच आहे. - डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय अहेरी कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच रक्ततपासणी अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दोन वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. येथे रक्त तपासणीचे काम कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. परिणामी वाढत्या रूग्ण संख्येमुळे रक्त तपासणीचा रिपोर्ट रूग्णांना मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे. विशेष म्हणजे या रूग्णालयात रक्तनमुने घेण्यासाठीच्या स्लाईडपट्ट्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सफाई कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर ११ पदांपैकी पाच जागा रिक्त आहे. त्यामुळे रूग्णालय परिसरात स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना संपूर्ण रूग्णालयाची सफाई करण्यास अडचण आहे.