शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी रुग्णालयात ५० खाटा वाढणार

By admin | Updated: August 28, 2015 00:16 IST

नागपूर मंडळाच आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी गुरूवारी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला.

उपसंचालकांनी घेतला आढावा : विद्यमान इमारतीवर बांधकामअहेरी : नागपूर मंडळाच आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी गुरूवारी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयाची क्षमता दुप्पट करून ५० खाटांची वाढ करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला.आढावा बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. कुमरे, यूनीसेफचे अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यू. भारद्वाज, कार्यकारी अभियंता लोंढे, आर.सी.एच चे अधिकारी शंभरकर, उपअभियंता कोहळे, कनिष्ठ अभियंता सय्यद, शंकर मगडीवार, दिनेश येनगंटीवार, श्रीनिवास चतारे, पंकज नौनुरीवार आदी उपस्थित होते. अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी या चार तालुक्यांचा भार अवलंबून आहे. त्यामुळे या रुग्णालयात शेकडो रुग्ण भरती होण्यासाठी येतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. मात्र कधीकधी रुग्ण वाढत असल्याने रुग्णांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन आणखी ५० खाटा वाढविण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. डॉ. कन्ना मडावी यांनी इमारतीवर रुग्णायाचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविणे शक्य होईल. रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर दंत शल्य चिकित्सक, नेत्र विभाग, एसएनसीयू, आरबीएसके युनिट, ब्लड बँक आदी विभाग वर नेण्यात येतील. गरज पडल्यास इतरही विभागांचे स्थानांतरण केले जाईल. यावेळी डॉ. जयस्वाल यांनी इमारतीच्या बांधकामाकरिता लागणारे प्रोव्हीजनल स्टेज- १ इस्टिमेट व प्रोव्हीजनल प्लॅन १ आठवड्याच्या आत ३ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे निर्देश दिले. तसेच रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेली यंत्रसामग्री व नवीन इमारत बांधण्यात आल्यानंतर लागणारी यंत्रसामुग्री यांची यादी देण्यात यावी, असेही निर्देश कनिष्ठ अभियंत्याला दिले. (शहर प्रतिनिधी)