शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापनेनंतर दारूरूपी राक्षसाचा केला संहार

By admin | Updated: October 16, 2015 01:57 IST

कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील महिला व गावकऱ्यांनी मिळून गावात मागील वर्षी

वैरागड : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील महिला व गावकऱ्यांनी मिळून गावात मागील वर्षी दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा केली. त्याचवेळी गावात दारूबंदी करण्याचा निर्धार करून या दारूबंदीची कडक अंमलबाजवणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातून दारूरूपी राक्षसाचा संहार झाला आहे. कढोलीत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कढोली येथे दुर्गा उत्सव व गुडीपाडवा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. येथील जुन्या बाजार चौकात मागील १५ वर्षांपासून नवरात्रीदरम्यान दुर्गा उत्सव साजरा केला जातो. मागील वर्षी गावकऱ्यांनी दुर्गा मातेचे मंदिर उभारून त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. या प्रतिष्ठापणेदरम्यान अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारी दारू गावातून हद्दपार करण्याचा विडा गावातील महिलांनी उचलला. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महिलांनी स्वत: कंबर कसली व लक्ष घातले. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याशिवायसुद्धा गावात दारूबंदीची अंमलबजावणी होत आहे. दारूबंदी झाल्यामुळे आजपर्यंत गावात होणारे तंटे, भांडण अत्यंत कमी झाले आहेत. परिणामी गावात शांतता नांदण्यास सुरुवात झाली आहे. मंदिरात नित्यनेमाने रोज सकाळी व सायंकाळी आरती केली जाते. या आरतीला गावातील महिला व आबालवृद्ध एकत्र येतात. या आरतीमुळे गावात वर्षभर धार्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते. विशेष म्हणजे दुर्गा मंडळात सर्वच समाजाचे नागरिक सहभागी होतात. त्यामुळे एकोपा राहण्यास मदत होते. शेवटच्या दिवशी गोपालकाला करून महाप्रसादाने नवरात्र उत्सवाचा सांगता केली जाते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक सहभागी होतात. नवही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांची गर्दी उसळत असली तरी कुठेही गोंधळ होत असल्याचे दिसून येत नाही. नवरात्रीच्या निमित्ताने कढोली येथील महिलांनी घेतलेला दारूबंदीचा निर्णय इतर गावांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याची बाब बोलली जात आहे. (वार्ताहर)