शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

३७ वर्षांनंतरही गडचिरोलीवासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

क्षेत्रफळाच्या तुलनेत तालुक्यांची संख्या कमी आहे. अहेरी, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचा विस्तार सुमारे १०० किमीचा आहे. १०० किमी अंतर कापून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुकास्थळी यावे लागते. जंगलाने व्याप्त या भागात वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. एका दिवशी तालुकास्थळी जाऊन परत येणे शक्य होत नाही.

ठळक मुद्दे२० टक्के गावांना रस्तेच नाही : रोजगाराची समस्या गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलाने व्याप्त व आदिवासी बहुल भागाचा विकास व्हावा, या उद्देशाने ३७ वर्षांपूर्वी २६ आॅगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. जिल्हा निर्मितीला ३७ वर्षांचा कालावधी उलटला तरी येथील जनतेची विकासाबाबत उपेक्षाच झाली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ७६ टक्के भूभाग जंगलाने व्यापला आहे. सद्य:स्थितीत १२ तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या तुलनेत तालुक्यांची संख्या कमी आहे. अहेरी, सिरोंचा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यांचा विस्तार सुमारे १०० किमीचा आहे. १०० किमी अंतर कापून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तालुकास्थळी यावे लागते. जंगलाने व्याप्त या भागात वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. एका दिवशी तालुकास्थळी जाऊन परत येणे शक्य होत नाही. परिणामी अनेक पात्र लाभार्थी सुध्दा शासकीय योजनांपासून वंचित आहेत. शेवटच्या टोकावर असलेला सिरोंचा तालुका जिल्हास्थळापासून २१० किमी अंतरावर आहे. अंकिसा, आसरअल्ली ही गावे जिल्हास्थळापासून २५० किमी अंतरावर आहेत. त्यामुळेच अहेरी जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी पद देण्यात आले आहे. तरीही काही महत्त्वाची कामे करण्यासाठी गडचिरोलीलाच यावे लागते. सद्य:स्थितीत अहेरीतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभार सोपविला आहे. कुपोषण, अ‍ॅनिमिया, सिकलसेल, कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. मात्र मेडिकल कॉलेज नाही. दुर्गम भागातील अजुनही २० टक्के गावांपर्यंत रस्ते पोहोचले नाही. नदी, नाल्यांवर पूल नाही. त्यामुळे रूग्ण व गरोदर मातांना खाटेवर रूग्णालयात दाखल करावे लागते.रोजगाराची समस्या गंभीरवनसंपदेने नटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती सुध्दा आहे. मात्र एकही उद्योग नाही. त्यामुळे येथील नागरिकांना शेतीवरच चरीतार्थ भागवावा लागतो. सिंचनाची सुविधा नसल्याने शेती सुध्दा बेभरवशाची झाली आहे. शेतीच्या माध्यमातून केवळ दोन ते तीन महिन्यांचा रोजगार उपलब्ध होतो. त्यानंतर मात्र बेरोजगारीच्या संकटाचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. एकही मोठा उद्योग जिल्ह्यात नाही. आष्टीजवळील कोनसरी येथे लोहखनिज प्रकल्प निर्मितीचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र या प्रकल्पाबाबत पुढची प्रक्रिया सुरू झाली नाही. काही तालुकास्थळी शासनाने एमआयडीसाठी जमीन खरेदी करून ठेवली आहे. मात्र त्या ठिकाणी उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे एमआयडीसीच्या जागा अजूनही पडीक आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली