शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात होर्डिंग्ज झाकले

By admin | Updated: September 4, 2014 23:44 IST

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस, राकाँ आघाडी सरकारने लोकाभिमुख कामांची प्रसिद्धी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा

आचारसंहितेपूर्वीच : सरकारी योजनांची जनजागृती करणारेगडचिरोली : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर राज्यातील काँग्रेस, राकाँ आघाडी सरकारने लोकाभिमुख कामांची प्रसिद्धी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करण्यास सुरूवात केली आहे. मात्र गडचिरोली जिल्हा मुख्यालयात लावण्यात आलेल्या सरकारी जाहिरातीच्या होर्डीग्जवर पांढरा कापड लावून त्या झाकण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया व अन्य साधनांचा वापर करीत मोठ्या प्रमाणावर मार्केटींग केले होते. त्याचा चांगला परिणाम दिसून आला. त्यांचाच कित्ता गिरवत सध्या राज्यातील आघाडी सरकारने आपल्याही कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा प्रचार सुरू केला आहे. बसस्थानक व गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर होर्डींग्ज लावण्यात आल्या आहेत. गडचिरोली या मागास जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयाच्या बसस्थानकावर अशा जाहिराती लावण्यात आल्या होत्या. अद्याप विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झालेली नाही. मात्र सदर जाहिरात फलकावर पांढरे कापड टाकून त्या झाकून टाकण्यात आल्या आहे. याप्रकारामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आमचे सरकार असून आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिराती का झाकण्यात आल्या, याची विचारणा ते प्रशासनाला करू लागले आहे. असा प्रकार कसा काय झाला, अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव समशेर पठाण यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली.शहरात मनोधैर्य योजना, जलसंधारण विभाग, वन विभागाचा तेंदूपत्ता बोनस वितरण आदीबाबतच्या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. बसस्थानकावरील या जाहिराती मागील आठवडाभरापासून झाकण्यात आल्या आहेत. या संदर्भात प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांना विचारणा केली असता, शासनाच्या जाहिराती या सरकारी मालकीच्या होर्डिंग्जवर लावण्यात आल्या आहेत. मात्र मोक्याच्या व सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी काही जाहिराती या खासगी कंपनीच्या होर्डिंग्जवर लावण्यात आल्या असाव्यात व त्या काही मुदतीसाठीच असाव्यात. त्यामुळे झाकल्या गेल्याचा प्रकार घडला असेल, असे ते म्हणाले. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच गडचिरोली बसस्थानकावर चार होर्डिंग्ज सरकारी जाहिरातीचे झाकण्यात आले आहे. या प्रकारामुळे काँग्र्रेस पक्षाचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)