शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पौष्टिक रानभाज्या घालताहेत भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST

रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची आदिवासी समाजाला पारंपरिकरीत्या माहिती असते. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. ...

रानभाज्या जंगलात सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची आदिवासी समाजाला पारंपरिकरीत्या माहिती असते. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहोचते. जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानात रानभाज्या दिसून येतात. कुड्याची भाजी, तराेटा भाजी या वनस्पतींपैकी काहींचा वापर आदिवासी समाजात विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून विविध पदार्थ बनविले जातात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी आदी खाद्यान्न तयार होतात. काही भाज्या थंड, तर काही उष्णधर्मीय आहेत. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.

(बॉक्स)

काही भाज्या आणि त्यांचे गुणधर्म

कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो. रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी, मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू वा कुवाळूची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. हा फरक सरावाने ओळखता येतो, अशी माहिती रानभाज्यांचा महोत्सव आयोजित करणारे यशोधन देशमुख देतात. या भाज्यांमध्ये लोह, खनिज यांचा भरपूर साठा असल्याने त्यांचा आस्वाद पावसाळ्याच्या दिवसांत शाकाहारी किंवा मांसाहारी अशा कोणत्याही जेवणासोबत घेता येतो.

(कोट)

जंगलात मिळणाऱ्या रानभाज्यांचे सेवन आदिवासी समाज नेहमीच करत असल्याने त्यांच्यासाठी ते शक्तिवर्धक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे ठरत आहे. यामध्ये चावावेल, कार्टुल, शेऊळ, शेवाळे, कुड्याचे फूल, चारा, घोळ, रताळ्याचे कोंब, भोपा, चायवळ, मशरूम, काटवल आणि पावसाळ्याच्या दिवसात जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचा उल्लेख करता येईल. निसर्गाच्या सानिध्यात या रानभाज्या वाढत असल्याने त्या रसायनविरहित असतात. नागरिकांनी या रानभाज्यांचा भरपूर प्रमाणात आस्वाद घ्यावा.

- प्रा. डॉ. कैलास निखाडे,

निसर्ग अभ्यासक, भामरागड

===Photopath===

260621\102426gad_1_26062021_30.jpg

===Caption===

26gdph28.jpg