शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर न भरल्यास जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:42 IST

चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांची माहिती : शहरात २३ मार्चपासून राबविणार धडक मोहीम

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीच्या हद्दीत संपूर्ण शहर, शंकरपूर, सावरहेटी, दहेगाव आदी भागाचा समावेश आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चालू वर्षातील व मागील थकीत मालमत्ता कराचा अद्यापही भरणा केलेला नाही. नागरिकांनी तत्काळ मालमत्ता कराचा भरणा करावा अन्यथा थकबाकीदाराविरोधात २३ मार्चपासून शुक्रवारपासून जप्तीची कारवाई करणार, अशी माहिती चामोर्शी नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी लोकमतशी बोलताना दिली.नगर पंचायतीच्या मालमत्ता करात चालू व थकीत गृहकर, पाणीकर, आरोग्य कर, खास पाणीकर, दिवाबत्तीकर, गाडेभाडे कर आदींचा समावेश आहे. सदर कर मार्च २०१८ पर्यंत न भरल्यास २३ मार्चपासून नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने धडक मोहीम राबवून जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयात येऊन मालमत्ता कराचा भरणा करावा व नगर पंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी जुही यांनी केले आहे.गेल्या काही दिवसांपासून नगर पंचायतीचे कर्मचारी वॉर्डावॉर्डांत फिरून मालमत्ता व पाणी कराची वसुली करीत आहेत. तसेच शहरातील अनेक नागरिक स्वत: नगर पंचायतीच्या कार्यालयात जाऊन कराचा भरणा करीत आहेत. शासन व जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्च २०१८ पर्यंत चालू आर्थिक वर्षातील कर व मागील थकबाकी १०० टक्के वसुल करण्यात यावी, असे निर्देश जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने काही नगर पालिका व नगर पंचायती कामाला लागल्या आहेत.चामोर्शीकरांवर ७८ लाखांची थकबाकीचामोर्शी नगर पंचायतीच्या मालमत्ता कराची मागील थकबाकीची रक्कम २० लाख ५६ हजार ५५९ तर चालू वर्षातील ३५ लाख ८२ हजार ५०६ रूपये कुटुंबधारकांवर आहे. थकीत पाणीकर १० लाख ३ हजार ८५८, चालू वर्षातील पाणी कर ११ लाख ९३ हजार १६० रूपये आहे. मागील थकबाकी व चालू वर्षातील मिळून मालमत्ता व पाणी कराची एकूण ७८ लाख ३६ हजार ८३ रूपयांची नगर पंचायतीची मागणी आहे. १०० टक्के कर वसुली करण्यासाठी मुख्याधिकाºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने वॉर्डावॉर्डांत नगर पंचायतीचे कर्मचारी फिरत आहेत.

टॅग्स :Taxकर