शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी

By admin | Updated: February 25, 2016 01:18 IST

जि. प. सदस्य डॉ.तामदेव दुधबळे यांनी ‘३०-५४’ व ‘१३ वने’ शीर्षकांतर्गत करावयांच्या कामातील अनियमितता व असमतोलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...

विकास कामे अडवू नका : अतुल गण्यारपवार यांचा जि. प. सदस्यांना सल्लागडचिरोली : जि. प. सदस्य डॉ.तामदेव दुधबळे यांनी ‘३०-५४’ व ‘१३ वने’ शीर्षकांतर्गत करावयांच्या कामातील अनियमितता व असमतोलासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ फेब्रुवारीला याचिका दाखल केली होती. उपरोक्त शीर्षांतर्गत मंजूर कामांना स्थगिती द्यावी, अशी त्यांची मागणी होती. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने युक्तीवाद ऐकल्यानंतर विकास कामांत अडथळा होऊ नये, सदर मुद्दा लक्षात घेऊन या कामावरील स्थगिती उठविली व सदर कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बांधकाम समितीच्या कामात अनियमितता आढळून आली नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे जि. प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, जगन्नाथ बोरकुटे यांच्यासह त्यांच्या सहकारी जि. प. सदस्यांनी आपली जाहीर माफी मागावी, असा सल्ला जि. प. चे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी माहिती देताना गण्यारपवार म्हणाले, जि. प. ला ३०-५४ लेखा शीर्षाखालील १६ कोटी ९८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून १४२ कामांना मान्यता देण्यात आली. तर १३ वने निधी अंतर्गत ७४२ लाख रूपयांतून १४२ कामांना मंजुरी देण्यात आली. जि. प. च्या बांधकाम समितीने शासन नियमानुसार या कामांचे नियोजन केले. अधिकाऱ्यांनीही सर्व बाबी तपासून या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या कामाचे वर्क आॅर्डर देण्याच्यावेळी जि. प. सदस्य डॉ. तामदेव दुधबळे, जगन्नाथ बोरकुटे यांच्यासह काही सदस्यांनी या कामात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत विशेष सभेची मागणी केली. मात्र विशेष सभेमध्ये विरोधक जि. प. सदस्यांची बाजू लंगडी पडली. न्यायालयानेही त्यांना मोठी चपराक दिली. त्यामुळे जि. प. सदस्यांनी विकास कामात अडथळे आणू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. (प्रतिनिधी)