शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दाेघांच्या अपघाती निधनाने कुटुंबांचे छत्र हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:06 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड-वासाळा मार्गादरम्यान असलेल्या चामोर्शी माल येथील श्रीकृष्ण आबाजी बोबाटे (३३ ) व अमीर गणपत जराते (२४) हे ...

आरमोरी तालुक्यातील वैरागड-वासाळा मार्गादरम्यान असलेल्या चामोर्शी माल येथील श्रीकृष्ण आबाजी बोबाटे (३३ ) व अमीर गणपत जराते (२४) हे दाेघेही रोजगारासाठी दररोज ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथे गवंडी कामावर मजूर म्हणून जात होते. श्रीकृष्ण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. घरी त्याची पत्नी, मुलगा, मुलगी व आई-वडील अर्थात घरचा कर्ता व्यक्ती हाच हाेता. अमीर गणपत जराते हादेखील आपल्या आई-वडिलांना एकटाच हाेता. अविवाहित असला तरी घरातील तरुण व्यक्ती म्हणून त्याच्यावरच कुटुंबाची जबाबदारी होती. हे दोघे सुटी न घेता नित्यनेमाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता दररोज गवंडी कामावर जात; परंतु या दोन्ही होतकरू तरुणांचा अपघाती अंत हाेईल, असे कुणालाही वाटत नव्हते. बुधवार, १० मार्चला हे दोघे कामावरून सुटी झाल्यानंतर वांद्र्यावरून स्वगावी चामोर्शी माल येथे येण्यासाठी निघाले. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बरड (किन्ही) जवळ दोघांचे दुचाकी वाहन विरुद्ध दिशेने येणाऱ्या बैलगाडीवर समोरासमोर धडकले. या अपघातात अमीर जराते हे जागीच ठार झाले, तर श्रीकृष्ण बोबाटे यांनी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. दोन्ही होतकरू आणि मनमिळाऊ तरुणांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने चामाेर्शीसह परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.