शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दंडकारण्यात वर्षभरात ९६ नक्षलवाद्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:28 IST

Gadchiroli News महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात, अर्थात नक्षलवाद्यांच्या भाषेत ‘दंडकारण्या’त विविध कारणांनी गेल्या वर्षभरात ९६ नक्षलवाद्यांना प्राण गमवावे लागले आहेत.

ठळक मुद्देनक्षल पत्रकातून उघडकाही आजाराने गेले तर काहींचा गोळीने घेतला वेध

मनोज ताजने

 लोकमत न्यूज नेटवर्क   गडचिरोली : महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात, अर्थात नक्षलवाद्यांच्या भाषेत ‘दंडकारण्या’त विविध कारणांनी गेल्या वर्षभरात ९६ नक्षलवाद्यांना प्राण गमवावे लागले आहेत. येत्या २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या नक्षलींच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या पत्रकातूनच ही बाब स्पष्ट झाली. विशेष म्हणजे त्यात मोठ्या कॅडरमधील काही नेत्यांचाही समावेश आहे.

जुलै २०२० ते जुलै २०२१ या वर्षभराच्या कालावधीत देशभरात १५० नक्षलवाद्यांनी प्राण गमावले. त्यातील ९६ जण हे दंडकारण्यातील आहेत. त्या ९६ मध्ये २७ महिला नक्षली आहेत. मृत नक्षल नेत्यांमध्ये पवन (एसझेडसीएम), अजित (डीव्हीसीएम), सोमजी (डीव्हीसीएम), रूकनी (महिला डीव्हीसीएम), वर्गेश (डीव्हीसीएम) आणि सतीश (डीव्हीसीएम) आदी वरिष्ठ कॅडरचा समावेश आहे. यातील काही जण पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले तर काही कोरोनासह इतर आजारांनी मरण पावले.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या आक्रमकपणामुळे गेल्या काही वर्षात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षल कारवाया नियंत्रणात आल्या आहेत. याशिवाय गडचिरोलीत अनेक चकमकींमध्ये नक्षलवादी मारले गेल्याने आत्मसमर्पणाचे प्रमाणही वाढले आहे.

शहीद सप्ताह पाळण्याचे आवाहन

सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारल्या जाणाऱ्या नक्षलींच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट यादरम्यान नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळला जातो. यावर्षीही त्यांनी हा सप्ताह पाळण्याचे आवाहन करणारी पत्रके दुर्गम भागात टाकली आहेत. सोशल मीडियावरूनही ही पत्रके फिरविली जात आहेत. या सप्ताहात मृत नक्षलींच्या स्मृतित शहीद स्मारकांची उभारणी आणि विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान नक्षल्यांचे कार्यक्रम यशस्वी होऊ न देण्यासाठी पोलीस विभागही सतर्क झाला आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी