शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

९ इमारती पूर्ण, ७ बांधकाम प्रगतीपथावर

By admin | Updated: April 26, 2017 01:07 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शालेय इमारत व मुला/मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभाग : गडचिरोली प्रकल्पात २२ शाळा इमारती व ११ वसतिगृहाचे बांधकाम गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शालेय इमारत व मुला/मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत ११ शाळा इमारती व ११ वसतिगृह बांधकाम करण्यात आले. त्यातील ९ इमारती पूर्ण झाल्या असून ७ इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी ए. आर. शिवणकर यांनी लोकमतला दिली आहे. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत सोनसरी, कोटगूल, रांगी, मुरूमगाव, पेंढरी, इंग्रजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथे शाळा इमारती बांधण्यात आल्या. सध्या भाकरोंडी व अंगारा येथील शाळा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इमारत हस्तांतरणाचे काम बाकी आहे. तर सावरगाव, रेगडी, मार्र्कंडादेव येथील इमारती बांधकाम प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती शिवणकर यांनी दिली आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत ११ वसतिगृह इमारती बांधण्यात आल्या. यामध्ये मसेली, अंगारा, मार्र्कंडा, मसेली, गॅरापत्ती, कारवाफा, गॅरापत्ती येथील इमारतींचा समावेश आहे. या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु हस्तांतरण झालेले नाही. तसेच कुरूंडी माल, सोडे, येंगलखेडा येथीलही बांधकामही प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून मुरूमगाव येथे आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सोडे आश्रमशाळेत जनरेटर व फिल्टर बंद असल्याची बाब आदिवासी विकास विभागाने मान्य केली असून संपूर्ण महाराष्ट्रात आश्रमशाळाकरिता खरेदी करण्यात आलेल्या वॉटर फिल्टर, जनरेटर, सोलर वॉटर हिटर, बायोमेट्रिक मशीन यांच्या खरेदीकरिता निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. खरेदीची चौकशी करून यासंदर्भातील अहवाल शासनास सादर व्हायचा आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या साहित्याची दुरूस्ती करता येत नाही. त्यामुळे सोडे व इतर आश्रमशाळातील वॉटर फिल्टर, जनरेटर, वॉटर हिटर यांची दुरूस्ती प्रलंबित राहिलेली आहे, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) विनोद कुळकर्णी यांनी दिली आहे. लोकमतमध्ये १९ एप्रिल रोजी सावगाव शाळेच्या इमारतीसंदर्भात आलेल्या वृत्ताच्या स्पष्टीकरणात त्यांनी सदर माहिती दिली आहे.