शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

८६ हजार हेक्टर शेती पडीत राहणार

By admin | Updated: August 12, 2015 01:18 IST

जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून

अत्यल्प पर्जन्यमान : शेतकरी प्रचंड संकटातगडचिरोली : जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा खरीप हंगामात जवळजवळ ८६ हजार हेक्टर जमीन पडीत राहण्याचे चिन्ह दिसू लागली आहे. प्रशासन गतवर्षी एवढा पाऊस यंदाही झाल्याचा दावा करीत असला तरी जिल्ह्याच्या बहूतांश तालुक्यात पाऊस झालाच नसल्याने रोवणीची कामे थांबली आहेत.गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही सिंचन व्यवस्था नाही. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ४९ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. गतवर्षी २०१४ मध्ये पाऊस समाधानकारक झाल्याने जिल्ह्यात ६ आॅगस्ट २०१४ पर्यंत धानाची ४४ हजार ९९१ हेक्टर क्षेत्रावर रोवणी पूर्ण करण्यात आली होती. तर यंदा ६ आॅगस्ट २०१५ पर्यंत केवळ २९ हजार २८५ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे क्षेत्र १५ हजार ७०६ हेक्टरने कमी आहे. अर्धा पावसाळा निघून गेला असून आॅगस्ट महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहे. उकाड्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये धानावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी प्रचंड तणावात असल्याचे ग्रामीण भागात फेरफटका मारल्यावर दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)पावसाच्या आकडेवारीतही प्रशासनाची कावेबाजी४गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १४०० मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१४ मध्ये ११ आॅगस्टपर्यंत ६३६.१० मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा ११ आॅगस्टपर्यंत ६५४.७३ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा कमी असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-काँग्रेस४यंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली, त्यांचे रोवणेही करपून गेले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २५ हजार रूपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे.शेतकऱ्यांकडे महागडे खते, कीटकनाशके पडूनच४अनेक शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वीच पीक कर्ज मिळाल्यावर वर्षभराच्या हंगामासाठी लागणारे खते, कीटकनाशके खरेदी करतात. मात्र यंदा पाऊस झाला नाही. त्यामुळे अजूनही रोवणी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांनी खरेदी केलेले हजारो रूपये किमतीचे महागडे कीटकनाशके, खते त्यांच्या घरी पडून आहे. याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा शेतकऱ्यांच्या जवळून निघून गेला आहे. त्यामुळे शेतकरी कमालीच्या आर्थिक अडचणीत आहे. ४यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकऱ्यांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी अर्धा पावसाळा पार होऊनही आलेल्या नाही. याचा अर्थ शेतकरी चिंताग्रस्त आहे.यंदा शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न येण्याची तिळमात्र शक्यता नाही. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिमहा १ हजार रूपये मानधन स्वरूपात पुढील वर्षभर वितरित करावे.- चंदू वडपल्लीवार, पं. स. उपसभापती, आरमोरी