शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

८२ हातपंप अपूर्ण

By admin | Updated: August 6, 2014 23:49 IST

जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात २ कोटी रूपयांच्या निधीतून एकूण २३० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी १४८ हातपंपाचे खोदकाम जुलैअखेर पूर्ण झाले असून

काम मंदावले : जिल्हा वार्षिक योजनेतीलगडचिरोली : जिल्हा वार्षीक योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात २ कोटी रूपयांच्या निधीतून एकूण २३० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी १४८ हातपंपाचे खोदकाम जुलैअखेर पूर्ण झाले असून पावसामुळे तसेच मजुरांच्या टंचाईमुळे तब्बल ८२ हातपंपाचे खोदकाम अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती हाती आली आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक ३ जुलै २०१४ रोजी पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षीक योजनेतून विंधन विहिरीद्वारे पाणी पुरवठा व विंधन विहिरी जलनिर्मितीसाठी २ कोटी रूपयाची तरतूद करण्यात आल्याची माहिती संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. जिल्हा वार्षीक योजनेतून जिल्ह्यातील बाराही तालुक्यात २१० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. तसेच अधिकचे १० हातपंपाचे काम मंजूर करण्यात आले. यात अहेरी तालुक्यात २४, आरमोरीत १३, भामरागड ६, चामोर्शी ६७, देसाईगंज ११, धानोरा ११, एटापल्ली १४, गडचिरोली २२, कोरची ६, कुरखेडा २१, मुलचेरा ११, सिरोंचा तालुकयात २४ हातपंपांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत जून महिन्यात हातपंप खोदण्याच्या कामाला सुरूवात झाली. या महिन्यात हातपंप खोदकाम युध्द पातळीवर झाले. मात्र जुलै महिन्यात संततधार पाऊस कोसळल्याने हातपंप खोदकाम मंदावले. जुलै अखेर १४८ हातपंपाचे काम पूर्ण करण्यात आले. यात अहेरी १७, आरमोरी १०, भामरागड ४, चामोर्शी ३९, देसाईगंज ७, धानोरा ५, एटापल्ली ११, गडचिरोली १०, कोरची ४, कुरखेडा ११, मुलचेरा ६ व सिरोंचा तालुक्यात २२ हातपंपांचा समावेश आहे. पावसाळ्याच्या दिवसात हातपंप खोदण्याची मशीन जमिनीत फसते. यामुळे जमिनीतील गाळ काढण्यासाठी अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत हातपंप खोदण्यासाठी मजुरही तयार होत नाही. अशा विविध कारणांमुळे सध्या जिल्हाभरातील हातपंप खोदकाम थांबविण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरूवात होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)