शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

८00 ची रेती पोहोचली १३00 च्यावर

By admin | Updated: May 30, 2014 23:42 IST

न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती. रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00

देसाईगंज : न्यायालयाच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर बंदी आली होती.  रेती खुली असतांना रेतीसाठी नागरीकांना ८00 रूपये मोजावे लागत होते. मात्र बंदीनंतर त्याच रेतीसाठी १३00 रूपयाच्यावर  मोजावे लागत आहेत. न्यायालयाने रेतीवरील बंदी उठविली असली तरी वाढलेले भाव जैसे थे आहेत. रेती ठेकेदारांची चांदी झाली असली तरी सर्व सामान्यांचा घरबांधकामाचा बजेट यामुळे कोलमडला आहे.रेती उपशामुळे पर्यावरण संतूलन बिघडत असल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने संपूर्ण महाराष्ट्रातील रेतीच्या उपशावर आठ दिवसापूर्वी बंदी घातली होती. नदी पात्रातुन रेतीचा उपसा करण्यावर बंदी येणार याची चाहूल लागताच रेती ठेकेदारांनी मिळेत त्या मोकळ्या ठिकाणी रेती जमा करून ठेवली होती. घरबांधकामासाठी रेती अतिशय आवश्यक सामुग्री आहे.  त्यामुळे बंदीच्या काळात मनमर्जीच्या भावाने रेतीची विक्री केली जाऊ शकते.  याची खात्री ठेकेदारांना होती. घरबांधकाम करणार्‍या नागरिकांचा बजेट यामुळे कोलमडलेला आहे.  बंदीपूर्वी ज्या रेतीसाठी ८00 रूपये मोजावे लागत होते त्याच रेतीसाठी आता नागरिकांना १३00 ते १५00 रूपये मोजावे लागत आहेत. रॉयल्टीनुसार नदीपात्रातून रेतीचा उपसा केल्यावर ते संबंधीत ठिकाणीच टाकावे लागते, असा नियम आहे. मात्र ठेकेदार रेतीचा अवैध साठा करून रेतीच्या व्यवसायातून जास्त नफा  करण्याच्या तयारीला लागले आहेत. न्यायालयाने रेती उपशावरील बंदी उठवली असून २८ मेपासून रेती घाट सुरू झाले आहेत. मात्र रेतीचा व्यवसाय करणारे अजूनही वाढीव भावाने रेतीची विक्री करीत आहेत.. नियमानुसार नदीतून रेती काढतांना रेती व्यावसायिकांना त्या रेतीची रॉयल्टी दिलेली आहे.  संबंधीत ठिकाणावरून रेती बांधकामाच्या जागेवर नेण्यासाठी प्रत्यक्षात ठेकेदारांना दुसरी रॉयल्टी द्यावी लागते.  प्रत्यक्षात असे कधीच होत नाही.  रेती व्यवसायीक व महसूल विभागाच्या हातमिळवणीमुळे शासनाला अवैध रेती उपशातून लाखो रूपयांचा चूना लागत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)