शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्तारूढ गटाचे आठ उमेदवार अविरोधचुरस संपली : खिळसागर नाकाडे, मुकेश वाघाडे व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:11 IST

विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी असलेल्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

रत्नाकर धाईत यांची अविरोध निवडगडचिरोली : विदर्भातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी असलेल्या आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील ५० वर्षांपासून या बाजार समितीवर वर्चस्व ठेवणाऱ्या सत्तारूढ गटाचे आठ जागांवर उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची हे तालुके येतात. निवडणुकीत सहकारी संस्था मतदार संघातून इतर मागासवर्ग प्रवर्गातून विद्यमान मुख्य प्रशासक खिळसागर नाकाडे व विमुक्त जाती प्रवर्गातून रत्नाकर धाईत हे दोन उमेदवार अविरोध निवडून आले आहे. सहकार मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडून द्यावयाचे होते. त्यात दोन उमेदवार अविरोध निवडून आले. सत्तारूढ गटातून आता नऊ उमेदवार मैदानात आहे. त्यामध्ये व्यंकटी नागीलवार, हरीचंद्र डोंगरवार, दोषहर फाये, रामसू काटेंगे, ईश्वर पासेवार, देवाजी पिल्लारे, खेमराज हुलके, ललिता टिकले, कलावती कानतोडे यांचा समावेश आहे. तर याच गटात विरोधी आघाडीकडून ग्यानबा हारगुडे, ईश्वर खोडवे, आसाराम प्रधान, सरस्वती कांबळी या मैदानात आहेत. या गटात सत्ताधाऱ्यांचे पाच उमेदवार अविरोध निवडून आले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सत्तारूढ गटाकडून दुर्बल घटक प्रवर्गातून मुकेश वाघाडे निवडून आलेत आहेत. तर याच गटात अनुसूचित जाती मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे पुष्पलता मासरकर तर विरोधी गटाकडून दामोधर वट्टी मैदानात आहे. ग्रामपंचायत मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात सत्तारूढ गटाकडून कैलाश राणे, विनोद खुणे तर विरोधी गटाकडून चंदू गरफडे, सुजित मिस्त्री यांच्यासह कवडू सहारे, तुलाराम मडावी व दादाजी भर्रे हे निवडणूक लढत आहे. येथे विरोधी गटाला एकमत करून उमेदवार देता आले नाही. त्यामुळे या गटात विरोधकांच्याच उमेदवारांचा अधिक भरणा आहे. व्यापारी मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे हैदरभाई पंजवानी, गुरूमुखदास नागदेवे हे रिंगणात आहे. त्यांची लढत विरोधी गटाकडून मैदानात असलेले माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी व दादाजी ठेंगरी यांच्यासोबत आहे. हमाल - मापारी मतदार संघातून सत्तारूढ गटातर्फे दौलत ठाकरे, तर विरोधी गटातर्फे नवलाजी ठाकरे यांच्यात लढत आहे. १८ पैकी आठ जागांवर सत्तारूढ गटाचे उमेदवार अविरोध निवडून आल्याने या निवडणुकीतली चुरस आता संपल्यासारखी आहे. त्यामुळे राजकीय वातावरण फारसे तापलेले दिसून येत नाही. ७ मे रोजी या बाजार समितीसाठी विविध केंद्रांवर मतदान होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)