शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खेळण्यांसाठी ६४ लाखांचा निधी

By admin | Updated: August 3, 2014 00:07 IST

कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी

अंगणवाडी : विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा महिला व बालकल्याण विभागाचा प्रयत्नगडचिरोली : कॉन्व्हेंटकडे जाणारा विद्यार्थ्यांचा प्रवाह रोखून अंगणवाडी केंद्रातील प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीमध्ये खेळणी खरेदी करण्यासाठी ६४ लाख रूपयांची तरतूद केली आहे.दिवसेंदिवस पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत चालला आहे. याचा फटका प्राथमिक शाळांबरोबरच अंगणवाडींनाही बसायला लागला आहे. कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी सुरू करण्यात आली असून या पूर्व प्राथमिक शिक्षणात ३ ते ६ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉन्व्हेंटच्यापूर्वी या वयातील विद्यार्थी अंगणवाडीमध्येच जात होते. कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच थोडेफार शिकविलेसुद्धा जाते. तिच पद्धत अंगणवाडीमध्ये सुद्धा आहे. मात्र कॉन्व्हेंटच्या तुलनेत अंगणवाडीमध्ये खेळण्याचे साहित्य कमी असल्याने पालकवर्ग कॉन्व्हेंटला पसंती देत आहेत. परिणामी अंगणवाडीमधील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. अंगणवाडी शिक्षिकेलासुद्धा विद्यार्थी शोधून आणावे लागत आहेत. अंगणवाडीतही विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटप्रमाणे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा अंगणवाडीकडे ओढा वाढविण्याबरोबरच त्यांच्याही शारीरिक व मानसिक क्षमता विकसीत व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये ३ ते ४ खेळणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामध्ये डकरिडर, फोरसेटर चेअर, बोट शेफ सी-सॉ, हॉर्स सी-सॉ आदी खेळण्यांचा समावेश आहे. सदर खेळण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या पूनर्नियोजनात निधी वाढवून मागविण्यात आला होता. यासाठी सर्वसाधारण सभेत निधी वाढवून देण्याचे मान्य केले. तरीही प्रत्येक अंगणवाडीला एवढे साहित्य खरेदी करण्यासाठी ६४ लाखांपेक्षा जास्त पैशांची गरज आहे. मुलांच्या खेळण्यांबरोबरच गरोदर मातांचे वजन करण्यासाठी वेट मशीन खरेदी करण्याचाही निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. एवढे साहित्य अंगणवाडीमध्ये उपलब्ध झाल्यास अंगणवाडीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सध्य:स्थितीतही अंगणवाडीमध्ये काही खेळणी उपलब्ध आहेत. मात्र सदर खेळणी बरेच दिवस झाल्याने मोडकळीस आली आहेत. नवीन खेळण्यांची व्यवस्था जिल्हा परिषद करणार असल्याने पालक वर्गामध्येसुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. (नगर प्रतिनिधी)