शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

५७ गावांची रुग्णवाहिका निराधार

By admin | Updated: July 1, 2016 01:33 IST

तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या महागाव येथील ...

वर्षभरापासून चालक नाही : महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनाअभावी रुग्णांची गैरसोयअहेरी : तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या महागाव येथील रुग्णवाहिकेला वर्षभरापासून चालक नसल्याने येथे औषधोपचारासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी येथील तत्काळ रुग्णसेवा कोलमडली आहे. अनेक रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.तालुक्यातील ५७ गावे व ६२ हजार लोकसंख्येवर औषधोपचार करण्याची भिस्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १४ उपकेंद्र येतात. परंतु येथील रुग्णवाहिकेला वर्षभरापासून चालक नसल्याने ती निरूपयोगी ठरत आहे. आरोग्य केंद्राकरिता एकच रुग्णवाहिका घेण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणे अत्यंत त्रासदायक ठरत होते. परंतु वर्षभरापासून चालक नसल्याने अनेक रुग्णांना पर्यायी व्यवस्था करून प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचारासाठी यावे लागत होते. येथील चालकाचे पद तत्काळ भरावे, अशी मागणी अनेकदा निवेदनाद्वारे शासन, प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु समस्येची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णवाहिका निरूपयोगी ठरत आहे. यासंदर्भात आरोग्य अधिकारी आर. एम. राऊत यांची विचारणा केली असता, या परिस्थितीबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचा व्याप व येथील लोकसंख्या लक्षात घेता आणखी एका रुग्णवाहिकेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ५७ गावांतील ६२ हजार लोकांच्या आरोग्याकडे जिल्हा परिषद कानाडोळा करीत आहे. महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप लक्षात घेता येथील रुग्णवाहिकेला तत्काळ चालक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अहेरी भाजप तालुकाध्यक्ष संजय अलोणे यांनी प्रशासनाकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)शिपाई चालवित होते रुग्णवाहिकावर्षभरापासून रुग्णवाहिकेला चालक नसल्यामुळे येथील शिपाई म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी रुग्णवाहिका चालवित होते. परंतु ग्रामस्थांनी मागणी रेटून धरल्यानंतर ४ मे रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने एस. यू. गेडाम यांची चालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु ते एका दिवशी येऊन आपला रूजू अर्ज टेबलावर ठेवून कोणालाही न भेटता त्याच दिवशी पसार झाले. अद्यापही ते गायब आहेत. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या व गावी परत जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे.