शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

५० उद्योगांना संजीवनी

By admin | Updated: August 14, 2016 01:25 IST

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत...

८४ लाखांचे अनुदान : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम गडचिरोली : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सदर उद्योग स्थिरस्थावर होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा वितरित करण्यात आले आहे. सर्वच सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय नोकरी देणे सरकारलाही अशक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी स्वयंरोजगार करून त्यामाध्यमातून स्वत:चा प्रपंच भागवावा व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने शासनाकडून उद्योजकांना मदत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. उद्योगांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आहे. सदर मंडळ ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार स्थापनेसाठी मदत करते. तर जिल्हा उद्योग केंद्र ग्रामीण व शहरी भागातील युवकांना मदत करते. उद्योजकांना मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने जिल्ह्यातील १४ उद्योजकांना २८ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राने सुध्दा ३६ उद्योगांना ५६ लाख ६१ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. या अनुदानासोबतच बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे नवीन उद्योजकाला थोडे स्थिरस्तावर होण्यास मदत होते. त्यामुळे उद्योजक या सहायक अनुदानाची प्रतीक्षा करीत राहतात. (नगर प्रतिनिधी) आॅनलाईन करावा लागणार अर्ज मागील वर्षीपर्यंत उद्योगासाठी सहायक अनुदान पाहिजे असल्यास खादी ग्रामोद्योग मंडळ किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. यावर्षीपासून मात्र पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यावर विचार करणार आहे. ७७ लाखांचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाला सन २०१६-१७ या वर्षात १७ उद्योगांना ३३ लाख २३ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रातील २२ उद्योगांना ४४ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दोन्ही विभागांच्या वतीने लाभार्थींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.