शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

४८४ विद्यार्थी आजारग्रस्त

By admin | Updated: January 3, 2017 00:56 IST

अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने डिसेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात सहा आश्रमशाळा व एक अंगणवाडी केंद्रात ...

सहा आश्रमशाळांमध्ये मोहीम : अहेरी उपजिल्हा रूग्णालयाने केली ७५० बालकांची चिकित्सा अहेरी : अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने डिसेंबर २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात सहा आश्रमशाळा व एक अंगणवाडी केंद्रात एकूण ७५० विद्यार्थ्यांची दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४८४ विद्यार्थी विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले. तालुक्यातील कमलापूर येथील श्रीगुरूदेव आश्रमशाळा, पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळा, देवलमरी येथील भगवंतराव आश्रमशाळा, अहेरी येथील मुला-मुलींच्या दोन शासकीय आश्रमशाळा, गडअहेरी येथील अंगणवाडी केंद्र, अहेरी येथील सरस्वती शिशू विद्यालयात अहेरी उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीप्ती कोहळे, परिचारिका देवकी सुनतकर, शालू दुर्गे यांनी विद्यार्थ्यांची विविध तपासणी केली व आवश्यक औषधोपचार केला. तपासणीनंतर वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय बालस्वास्थ्य पथकाचे डॉ. रूबिना अंसारी, डॉ. मनीष शेंडे, डॉ. दीपक मडावी, डॉ. उज्ज्वला आत्राम, औषधी निर्माता गेमचंद गोंगले, स्नेहलता धाडसे, संदर्भसेवा देणार आहेत. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमाचे समुपदेशक मनीषा कांचनवार यांनी वैयक्तिक स्वच्छता, लैंगिक अत्याचार, सिकलसेल आजाराबाबत माहिती, तंबाखूचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोबाईल युनिट, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य केंद्राचे पथक तसेच रूग्णालयाच्या वैैद्यकीय चमूने विशेष सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) २१८ विद्यार्थी सिकलसेलग्रस्त उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील सहा आश्रमशाळा व एका अंगणवाडी केंद्रात बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत रक्तक्षयाचे २१९, मलेरियाचे २६, सिकलसेलचे २१८ तर इतर आजाराचे २१ रूग्ण असे एकूण ४८४ विद्यार्थी आजारग्रस्त आढळून आले. या विद्यार्थ्यांना त्यांना जडलेल्या आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजाराबाबत घ्यावयाची काळजी तसेच इतर बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर औषधोपचारही करण्यात आला.