शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

४७ टक्के धानाची रोवणी आटोपली

By admin | Updated: July 31, 2016 02:13 IST

कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत.

निम्म्या क्षेत्रावर आवत्या : ७१ हजार ८५९ हेक्टरवर लागवडीचे नियोजन गडचिरोली : कृषी विभागाने जिल्हाभरात केलेल्या पाहणीनुसार २६ जुलै पर्यंत ४७ टक्के रोवणीची कामे आटोपली आहेत. एकूण भात लागवड क्षेत्राच्या सुमारे ३७ हजार १९८ हेक्टरवर भाताची रोवणी झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ७१ हजार ८५९ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे १ लाख ५३ हजार २२८ हेक्टर आहे. सुरूवातीच्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली होती. अशा शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान रोवणीच्या कामाला सुरूवात केली होती. मात्र काही तालुक्यात पहिला पाऊस दमदार झाला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची पऱ्हे टाकली नव्हती. त्यानंतर सतत पाऊस झाल्याने रोवणीची कामे खोळंबली. अशा शेतकऱ्यांचे रोवणे झाले नाही. भात रोवणीला पर्याय म्हणून काही शेतकरी आवत्या टाकतात. चालू वर्षात ३४ हजार ६६१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत गडचिरोली तालुक्यात ६ हजार ६२६ हेक्टरवर भात पिकाची लागवड झाली आहे. त्यात ३ हजार १४२ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. कुरखेडा तालुक्यात ६ हजार ५३४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार ८६३ हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ९ हजार ८०० हेक्टरवर रोवणी तर ४ हजार २५० हेक्टरवर आवत्या, चामोर्शी तालुक्यात ३ हजार ८०४ हेक्टरवर रोवणी तर १ हजार २६६ हेक्टरवर आवत्या टाकण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यात ७५१ हेक्टरवर आवत्या पध्दतीने लागवड केली आहे. अहेरी तालुक्यात १ हजार २६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. एटापल्ली तालुक्यात ३८९ हेक्टर, धानोरा ३ हजार ७९९, कोरची १ हजार ६००, देसाईगंज ३ हजार ७९४, मुलचेरा १ हजार ७० तर भामरागड तालुक्यात ७५६ हेक्टरवर रोवणीची कामे आटोपली आहेत. असे एकूण ३७ हजार १९८ हेक्टरवर रोवणी झाली आहे. (नगर प्रतिनिधी) पावसाअभावी कामे थांबली मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसभर कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे धान रोवणीची कामे जिल्हाभरात ठप्प पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असेच शेतकरी धानाची रोवणी करीत आहेत. धान रोवणीची कामे थांबल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जेवढ्या उशीरा धानाची रोवणी होते, तेवढीच उत्पादनात घट होते. सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेले संपूर्ण तलाव तुडूंब भरले आहेत. त्यामुळे सदर तलावाचे पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पाणी न सुटल्यास रोवणीची कामे थांबणार आहेत.