शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

निमरड टोलातील ४५ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 00:50 IST

चामोर्शी तालुक्यातील निमरड टोला (रेखेगाव) येथील शेळ्या व गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असल्याने मागील आठ दिवसात ४५ शेळ्या व पाच गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपशुपालक धास्तावले : शनिवारी गावात शिबिर; आर्थिक मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील निमरड टोला (रेखेगाव) येथील शेळ्या व गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असल्याने मागील आठ दिवसात ४५ शेळ्या व पाच गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.निमरड टोला येथील बालाजी राऊत यांच्या २० शेळ्या, विस्तारी अन्नावार यांच्या २१ शेळ्या, भारत देऊरघरे यांचे चार शेळ्या, कुक्सू सरपे यांची एक गाय, देवाजी सरपे यांच्या दोन गायी, दिलीप सरपे यांच्या दोन गायी असे एकूण ५० जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. मागील आठ दिवसांपासून अज्ञात रोगाने शेळ्या व गायींचा मृत्यू होत असताना गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना न देताच गावटी उपचार करीत होते. एकामागून एक शेळ्यांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात घेऊन गावातील एका नागरिकाने याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी गावात जाऊन आजारी जनावरांवर उपचार केले.पंचायत समिती सदस्य रेखा नरोटे यांनी सुद्धा पशुपालकांची भेट घेतली. यावेळी ग्रा.पं. सदस्य सोमनाथ पिपरे, बबीता वासेकर, खेडूसिंग खसावत, रमेश नरोटे, मोरेश्वर वासेकर उपस्थित होते. गावातील जनावरांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शनिवारी या गावात औषधोपचा शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती पशुवैैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नेमक्या कोणत्या रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाला, हे मात्र कळू शकले नाही. जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. संबंधित पशुपालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, त्याचबरोबर पशुंच्या देखभालीबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.