शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

४४ जण झाले कनिष्ठ सहायक

By admin | Updated: December 22, 2016 02:12 IST

जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी ४४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली

कोटा वाढला : चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत वर्ग ४ चे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्यांपैकी ४४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून त्यांना कनिष्ठ सहायक पदावर नेमण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा कोटा २५ टक्केवरून ५० टक्के एवढा केला. त्या अनुषंगाने चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने पदोन्नतीची कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला विनंती केली होती. त्यावरून २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समूपदेशन वर्ग घेण्यात आले. या समूपदेशन वर्गादरम्यान ४४ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. समूपदेशन सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी राऊत, सहायक प्रशासन अधिकारी खेवले, विभागीय संघटक कैलास भोयर, जिल्हा सरचिटणीस राजू रेचनकर, सल्लागार दिवाकर मेश्राम, संघटक गजानन ठाकरे, टिकाराम मंगल, गंगाराम वेलादी, संतोष कस्तुरे, शशिकांत कारवा आदी उपस्थित होते. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा कोटा वाढावा, यासाठी जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने मोठा लढा दिला होता. (नगर प्रतिनिधी)