शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विकासावर ४३ कोटींचा खर्च

By admin | Updated: May 18, 2014 23:35 IST

उद्योगाअभावी शेती हेच येथील महत्वाचे रोजगाराचे साधन आहे. त्यामुळे शासनाचा शेती विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर राहतो.

 गडचिरोली : उद्योगाअभावी शेती हेच येथील महत्वाचे रोजगाराचे साधन आहे. त्यामुळे शासनाचा शेती विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर राहतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये विविध योजनांवर ४३ कोटी १ लाख ४५ हजार रूपये एवढा खर्च करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळाच्या ८० टक्के जमीन जंगलांनी व्यापली आहे. त्यामुळे शेतीसाठी अत्यंत कमी जमीन उपलब्ध आहेत. मागील काही वर्षापासून वनहक्कांतर्गत नागरिकांना जमीनीचे पट्टे देण्यात येत आहेत. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे. तेंदूपत्ता वगळता रोजगाराचे एकही साधन जिल्ह्यातील युवकांना उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नावरच वर्षभराची गुजरान करावी लागते. सिंचनाच्या सोयी नसल्याने एकच पीक घेऊन उर्वरित आठ महिने रिकामे राहावे लागते. येथील संपूर्ण आर्थिक परिस्थिती शेतीवर अवलंबून असल्याने शेती विकासावर शासनाचा मुख्य भर राहतो. शेती विकासासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रूपयाचा निधी प्राप्त होतो. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये कृषी व कृषी संलग्न सेवांच्या विकासासाठी सर्वसाधारण योजनांसाठी २३ कोटी ९४ लाख ३ हजार रूपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून शेती विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या. त्याचबरोबर शेतीशी संबंधीत उद्योग, प्रगत शेतीसाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठीही सदर निधीचा उपयोग करण्यात येतो. यामुळे शेतकर्‍याला प्रगत शेतीचे ज्ञान मिळण्याबरोबरच शेतीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या बरीच आहे. स्वातंत्र प्राप्त होऊन ६० वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असला तरी हा समाज अजुनपर्यंत विकासाच्या मृख्य प्रवाहात आला नाही. आदिवासी उपयोजनेंतर्गत १५ कोटी २० लाख २५ हजार रूपये प्राप्त झाले. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी ९७ कोटी रूपये तर अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी २९ कोटी १६ हजार रूपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. असा एकूण ४३ कोटी १ लाख ४५ हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. (नगर प्रतिनिधी)