शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

४१७ घरकूल मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2017 00:47 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ...

प्रशासनातर्फे कार्यवाही सुरू : शबरी आदिवासी घरकूल योजनागडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या १० तालुक्यात सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ४१७ घरकुलांना डिसेंबरअखेर मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. करारनामे घेणे तसेच आॅनलाईन नोंदणीची कार्यवाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गतीने सुरू आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकूल योजना २८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला या योजनेंतर्गत घराच्या अनुदानाची किमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी ७० हजार रूपये होती. सदर योजना ही आता ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. त्यानंतर १ एप्रिल २०१३ पासून या घरकुलाच्या अनुदानाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली व ती एक लाख रूपये इतकी करण्यात आली. आता ६ जानेवारी २०१७ च्या आदिवासी विकास विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ग्रामीण भागाकरिता एक लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. अनुदान वाढल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबधारकांकडून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. अद्यापही भामरागड, कोरची, एटापल्ली, धानोरा,अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी कुटुंबधारकांकडे राहण्यासाठी पक्के घर नाही. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची पुरेशा प्रमाणात माहिती नाही. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे दिसून येते. शबरी आदिवासी घरकूल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती गावागावात पोहोचविणे आवश्यक आहे. घरकुल लाभासाठी आता लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)५२६ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणीशबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता ८४० घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट शासनाने प्रशासकीय विभागांना दिले आहे. यापैकी ५२६ लाभार्थ्यांनी घरकूलच्या लाभासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ५९, आरमोरी ४३, भामरागड ५७, चामोर्शी ११८, देसाईगंज ५, धानोरा ७८, एटापल्ली ५८, गडचिरोली ४८, कोरची ७, कुरखेडा १३, मुलचेरा २९, सिरोंचा तालुक्यातील ११ लाभार्थ्यांचा समावेश आहे.