शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३४४ कामांवर चार कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:27 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो.

ठळक मुद्देहजारो मजुरांना रोजगार प्राप्त : रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातून गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची विविध कामे केली जातात. विशेष म्हणजे, ही कामे मजुरांमार्फत केली जात असल्याने य कामातून जिल्ह्यातील हजारो मजुरांना रोजगार मिळत असतो. रोहयो अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या विविध कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे.जिल्हा परिषदेमध्ये नरेगा विभाग असून या विभागामार्फत मजुरांमार्फत भातखाचरे निर्मिती व पुनर्जीवन, बोडी नुतनीकरण, शेततळे, माती नाला बांध आदी कामे केली जातात. सन २०१४-१५ ते २०१८-१९ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाची ५०० वर कामे करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या वर्षात शेततळ्यांची चार कामे करण्यात आली असून या कामांवर २.४७ लाख रुपयांचा खर्च झाला. बोडी दुरूस्तीची एकूण ११ कामे करण्यात आली असून यावर ७.८० लाख रुपयांचा खर्च झाला. एका मातीनाला बांध तयार करण्यासाठी १३ हजार रुपये खर्च करण्यात आला. तब्बल २६२ भातखाचऱ्याची कामे करण्यात आली. यावर ३८६.६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. याशिवाय ६६ भातखाचºयाच्या पुनरूजीवनाचे काम करण्यात आले. यावर २७.९० लाख रुपये खर्च झाले. सन २०१८-१९ या वर्षभरात जलसंधारणाच्या एकूण ३४४ कामांवर एकूण ४ कोटी ५४ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.सन २०१७-१८ या वर्षात शेततळ्यांचे चार, बोडी दुरूस्तींची सहा, भातखाचºयाची ९१, एक माती नाला बांध व भातखाचरे दुरूस्तीची २९ अशा एकूण १३१ कामांवर १५१.६५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. सन २०१६-१७, सन २०१५-१६ व सन २०१४-१५ या वर्षात सुध्दा शेततळे, बोडी दुरूस्ती आदीसह जलसंधारणाची विविध कामे रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने नरेगा विभागामार्फत दरवर्षी ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर घेण्यात येणाऱ्या कामांचा कृती आराखडा तयार केला जातो. याला जिल्हा प्रशासन व शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामास सुरूवात केली जाते. सध्या तापमानाचा पारा वाढला असून तेंदू हंगाम सुरू असल्याने रोहयो कामावर मजुरांची अत्यल्प उपस्थिती आहे.नरेगा अंतर्गत वृक्ष लागवडही होणारजि.प. नरेगा विभागाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला जातो. नरेगा विभागामार्फत गतवर्षी सुध्दा १०० वर रोपट्यांची लागवड करण्यात आली. यावर्षीच्या पावसाळ्यात शासनाकडून मिळालेल्या उद्दिष्टानुसार विविध जातीच्या रोपट्यांची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी खड्डे खोदण्याचे काम करावे लागणार आहे. या कामातून शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या योजनेमार्फत शासनाने प्रत्येक नोंदणीकृत मजुराला १०० दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी कायद्यान्वये दिली आहे.