शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

३६७ प्रकरणे निकाली

By admin | Updated: October 9, 2016 01:44 IST

सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ...

गडचिरोली, आरमोरीत लोक अदालत : १९ लाख ५७ हजार वसूलगडचिरोली/आरमोरी : सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच न्यायालयात ८ आॅक्टोबर रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. गडचिरोली व आरमोरी येथील न्यायालयात झालेल्या लोक अदालतीत एकूण ३६७ प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करण्यात आला. गडचिरोली येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १९ लाख ५७ हजार ५४२ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने जिल्हा न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष यू. एम. पदवाड यांच्या देखरेखीखाली गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीत एकूण ७७२ प्रकरणे दाखल करण्यात आले. यापैकी ३४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले तर लोक अदालतीच्या माध्यमातून १९ लाख ५७ हजार ५४२ रूपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश सु. तु. सूर यांनी पॅनल क्रमांक १ वर तर मुख्य न्याय दंडाधिकारी तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव आर. बी. रेहपाडे यांनी पॅनल क्र. २ वर काम पाहिले. तडजोडीस पात्र फौजदारी खटले, मोटार वाहन कायद्याअंतर्गतची प्रकरणे, लघु फौजदारी प्रकरणे तसेच नगर परिषदबाबत व इतर प्रकरणे मिळून एकूण ७७२ प्रकरणे या लोक अदालतीत सादर करण्यात आले होते. लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी वकील मंडळी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आरमोरी तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात घेण्यात आलेल्या लोक अदालतीत एकूण २४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. कायद्याचे कलम २०० अन्वये २३ व तडजोडीतून एक प्रकरण निकाली काढण्यात आले. यावेळी प्राधिकृत अधिकारी म्हणून न्या. संजय अटकारे, पॅनल सदस्य म्हणून प्रा. गंगाधर जुआरे व अ‍ॅड. ए. एम. कानकाटे उपस्थित होते. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या संमतीने सर्व गुन्ह्यांकरिता तडजोड शुल्क भरून २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर तडजोडी योग्य एका प्रलंबित मामल्याचा निपटारा करण्यात आला. यशस्वीतेसाठी न्यायालयाचे वरिष्ठ लिपीक प्र. का. आत्राम, कनिष्ठ लिपीक एस. आर. कामडी, पी. पी. देवकर, एन. डी. कोहळे यांनी सहकार्य केले.