बेरोजगारीचे संकट : तलावात पाणीसाठा नसल्याचा परिणामगडचिरोली : गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत आहे. याशिवाय जिल्ह्यात पाणी साठवणुकीची कोणतीही प्रभावी उपाययोजना नाही. परिणामी शेकडो तलावातील पाणीसाठा नष्ट झाला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात आला असून जिल्ह्यातील एकूण ३६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था बंद पडल्या असून त्या अवसायानात निघाल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत जवळपास १ हजार ६०० माजी मालगुजारी तलाव आहे. यापैकी जिल्ह्यातील आदिवासी बहूल सहा तालुक्यांच्या गावांमध्ये १०० टक्के पेसा कायदा लागू करण्यात आला आहे. या तलावांचे व्यवस्थापन करण्याचा अधिकार ग्रामसभेमार्फत ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आला आहे. परिणामी पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना तलाव मासेमारीसाठी मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाकडे एकूण १२ तलाव आहेत. यापैकी तीन तलाव पेसा क्षेत्रात असल्याने सदर तलाव मत्स्य सहकारी संस्थांना यंदा मिळाली नाही. जिल्ह्यात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी असल्याने चार वर्षांपूर्वी मत्स्य व्यवसायातून सहकारी संस्थांची प्रचंड आर्थिक भरभराट होत होती. मात्र गेल्या काही वर्षापासून दुष्काळ व पेसा कायदा लागू झाल्याने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र मर्यादित झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आहेत. यापैकी ७० सहकारी संस्था मासेमारीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. उर्वरित ३६ सहकारी संस्था मासेमारी बंद झाल्याने अवसायानात निघाल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)पाच पदे रिक्त४सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोलीच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण १३ पदे मंजूर आहेत. यापैकी आठ पदे भरण्यात आली असून पाच पदे रिक्त आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व मत्स्य क्षेत्रीक यांचा समावेश आहे.मत्स्य व्यवसाय कार्यालयाचा कारभार दोन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर४जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने गडचिरोली ेयेथे शासनाने सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय कार्यालय सुरू केले. मात्र या कार्यालयातील सहायक आयुक्त हे मुख्य पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे सदर कार्यालयाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू आहे. या कार्यालयातील पूर्वीचे सहायक आयुक्त ३१ मे २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील सहायक आयुक्तांचे पद भरण्यात आले नाही. सदर आयुक्त पदाचा प्रभार वर्ग २ च्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गडचिरोली कार्यालयाचा प्रभार असलेल्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे चंद्रपूरच्या कार्यालयाचा सहायक आयुक्त पदाचा पदभारही सोपविण्यात आला आहे. तलाव खोलीकरणाचा अभाव ४जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व सिंचाई विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या तलावांची खोलीकरण करण्यात आली नाही. त्यामुळे पावसाचे जमा झालेले पाणी शेतीला पाणी पुरवठा करताना पूर्णत: निघून जाते. तलावात गाळ साचल्यामुळे तलावातील पाणी साठ्याची खोली प्रचंड कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या मार्च महिन्यातच मासे उत्पादन घटण्यास सुरूवात होते. मत्स्य व्यवसायाला भरभराटी देण्यासाठी तलावांचे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे.माशांच्या उत्पादनात घट ४सन २०१४-१५ या वर्षात सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोली कार्यालयांतर्गत नोंदणीकृत जिल्ह्यात सर्व तलाव, नदी, नाले व इतर स्त्रोत मिळून ३ हजार २०७ मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले होते. यंदा २०१५-१६ या वर्षात १२ कोटी ८० लाख रूपये किमतीचे ३ हजार २०० मेट्रिक टन मासे उत्पादन झाले आहे. या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३५ हजार वर मेट्रिक टन माशांचे उत्पादन होत होते. मात्र तलाव कोरडे पडत असल्याने मत्स्य उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे.
३६ मत्स्य सहकारी संस्था अवसायानात
By admin | Updated: May 4, 2016 02:36 IST