शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

३५३ पेसा ग्रामसभांना मिळणार १८७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:35 IST

राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविकासात्मक कामे मार्गी लागणारआदिवासी उपयोजनेअंतर्गत वाढीव निधीची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील ग्रामपंचायतींना दरवर्षी आदिवासी विकास उपयोजनेतून ५ टक्के निधी दिला जातो. चालू आर्थिक वर्षासाठी (२०१८-१९) जिल्ह्यातील पेसा कायदा लागू असलेल्या ३५३ ग्रामसभांसाठी १८७ कोटी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यातून त्या ग्रामसभांच्या अंतर्गत येणाऱ्या १२१७ गावांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत.राज्यातील अनुसूचित क्षेत्राअंतर्गत येणाºया ग्राम पंचायतींमधील गावांचा विकास करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी उपयोजनेतून ५ टक्के निधी देण्याची तरतूद केली आहे. यासंदर्भात राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून बुधवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये १६ कोटी ३२ लाख २५ हजार २६९ रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. यावर्षी त्यात वाढ करण्यात आली.जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, भामरागड आणि एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येणाºया सर्व पेसा क्षेत्रातील ३५३ ग्राम सभांना हा निधी मिळणार आहे. याचा लाभ संबंधित ग्रामसभांच्या अंतर्गत येणाºया १२१७ गावांमधील ३ लाख ३७ हजार २५ गावकºयांना होणार आहे. त्यांच्या विविध सोयीसुविधांसाठी ५ टक्के निधीअंतर्गत पहिल्या टप्प्यात १४ कोटी २९ लाख ६९ हजार ६४० रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या निधीचे वाटप प्रत्येक ग्रामसभेच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे.उपलब्ध निधीनुसार, गावातील विकास कार्यावर खर्च करून निधीच्या विनियोगाची माहिती राज्य सरकारला पाठविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले आहे. या कामात ग्रामसेवकांची जबाबदारी वाढली असून त्यांना वेळोवेळी हिशेब द्यावा लागणार आहे.ग्रामसभांना दिलासायावर्षी ग्रामसभांना तेंदूपत्ता लिलावात बरेच नुकसान सहन करावे लागले. बोली लावण्यासाठी कंत्राटदारच आले नाही. जे आले त्यांनी कमी दरात कंत्राट घेतले. त्यामुळे अनेक ग्रामसभांकडे विकास कामांसाठी निधी नाही. शासनाकडून प्राप्त या निधीमुळे त्यांना आता बराच दिलासा मिळणार आहे.