शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या तलावात ३५ क्विंटल माश्यांचा मृत्यू

By admin | Updated: July 2, 2015 02:07 IST

येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे.

गडचिरोली : येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे संबंधित मत्स्य सहकारी संस्थेचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गडचिरोली येथील फुटक्या देवळाच्या दक्षिणेस मोठा तलाव असून, गोकुळनगरापर्यंत या तलावाचा विस्तार आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित या तलावाचा समावेश होतो. काही मत्स्य सहकारी संस्था मासेमारीसाठी हा तलाव पाटबंधारे विभागाकडून लीजवर घेत असतात. यंदा हा तलाव वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेकडे आहे. या संस्थेने तलावात मागच्या वर्षी सोडलेले मत्स्यबीज मोठे झाले असून, माशांची विक्री केली जात आहे. परंतु मंगळवारपासून शेकडो मासे पाण्यावर तरंगताना आढळून येत आहेत. याशिवाय कित्येक क्विंटल मासे तळाशी आहेत. दूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या तलावातील गाळ उपसलेला नाही. शिवाय मलमूत्र आणि पानवनस्पतीच्या कुजण्यामुळेही तलावाचे पाणी दूषित झाले आहे. परिणामी शेकडो माशांचा मृत्यू झाला. रोहू, कतला, म्रिगल, सिप्रिनस, ग्रासकार्प असे अनेक प्रजातींचे मासे या तलावात सोडले होते. अनेक मासे तीन ते चार किलो वजनाचे होते. परंतु दूषित पाण्यामुळे ते मृत्यूमुखी पडल्याने वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.विशेष म्हणजे, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामामुळे तसेच काही नागरिकांनी तलावाशेजारी अतिक्रमण करुन घरे बांधल्याने या तलावातील पाणी बाहेर जाण्यास मार्गच उरलेला नाही. परिणामी पाणी दूषित झाले.