शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

By admin | Updated: October 9, 2015 01:53 IST

आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप ...

पाच वर्षांतील परिस्थिती : गडचिरोली व अहेरी प्रकल्पात सोयीसुविधा पुरविणे अत्यंत गरजेचेगडचिरोली : आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप तसेच सर्पदंश यासारख्या अनेक कारणांमुळे मागील पाच वर्षांत गडचिरोली व अहेरी प्रकल्पातील सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही सर्व परिस्थिती आश्रमशाळांमधील दुरवस्थेमुळे निर्माण झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना अध्ययनासह भोजनाची व निवासाची व्यवस्था व्हावी. यासाठी शासनाने आदिवासी बहूल भागामध्ये आश्रमशाळा स्थापन केल्या आहेत. गडचिरोली प्रकल्पात २८ शासकीय, १९ अनुदानित अशा एकूण ४७ आश्रमशाळा आहेत. अहेरी प्रकल्पात ११ शासकीय, १४ अनुदानित, भामरागड प्रकल्पात आठ शासकीय, १३ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तिन्ही प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित अशा एकूण ९३ आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांमध्ये शिक्षणासह निवासाची सोय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तूसुध्दा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यामुळे १० वर्षांच्या पूर्वी आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने शासनाचे व संस्था प्रमुखांचे आश्रमशाळांच्या दर्जाकडे, इमारतीकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांपासून इमारतींची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात छतांमधून पावसाचे पाणी गळते. बेड तुटले असल्याने विद्यार्थ्यांना खालीच झोपावे लागते. आश्रमशाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता पाळली जात नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे राहते. या सर्व बाबींचा शिकार आश्रमशाळेतील विद्यार्थी बनत चालले आहेत. मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत २००९-१० या वर्षात तीन, २०११-१२ मध्ये एक, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये पाच, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये एक अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. अनुदानित आश्रमशाळेतील २०११-१२ मध्ये दोन, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये दोन, असे एकूण सहा विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. अहेरी प्रकल्पातील अनुदानित शासकीयमधील २०१० ते २०१५ या कालावधीत सहा विद्यार्थी तर अनुदानित आश्रमशाळेमधील याच कालावधीत सहा विद्यार्थी असे एकूण १२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (नगर प्रतिनिधी)