शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीसह ३१ हजाराची दारू जप्त

By admin | Updated: July 31, 2016 02:07 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह ....

देसाईगंज पोलिसांची कारवाई : ब्रह्मपुरीच्या दारू विक्रेत्यास अटक देसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंजचे पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शनिवारी देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गावर पाळत ठेवून विर्शी टी पार्इंटजवळ एका दारू विक्रेत्या आरोपींकडून दुचाकींसह ३१ हजार रूपयांची दारू जप्त केली. या प्रकरणी दारू विक्रेता दुचाकी वाहनचालक विनोद देवराव ठाकरे (३६) रा. पेटवार्ड क्रमांक ६ ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली असून त्याचेवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाईगंज-ब्रह्मपुरी मार्गाने दुचाकीवरून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांना मिळाली. त्यांनी या मार्गावरील विर्शी टी पार्इंटजवळ सापळा रचून एमएच ३४ डब्ल्यू ९८३० क्रमांकाचे वाहन थांबविले. या वाहनातील एका बॅगमधून सहा हजार रूपये किमतीची देशी दारूच्या १५० निपा जप्त केल्या व २५ हजार रूपये किमतीची दुचाकी ताब्यात घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)