शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

२८२ गावांत धान्य धाडण्याचे काम वेगात

By admin | Updated: May 30, 2014 23:41 IST

पावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये,

दुर्गम तालुके : पावसाळ्यात अनेक गावांचा तुटतो संपर्कदिलीप दहेलकर - गडचिरोलीपावसाळ्यात दरवर्षी अतवृष्टी होऊन जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत असते. जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या लक्षात घेता दुर्गम भागातील नागरिकांना आपत्तीचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण   संपर्क तुटणार्‍या दुर्गम तालुक्यातील २८२ गावांना नवसंजीवन योजनेंतर्गत चार महिन्याचे धान्य पोहोचविण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.पावसाळ्याच्या दिवसात अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. परिणामी अनेक गावांचे रस्ते बंद होऊन तेथील नागरिकांचा संपर्क तुटतो. गतवर्षी चारदा अतवृष्टी होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील शेकडो गावांचा अनेक दिवस संपर्क तुटला होता. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अतवृष्टी व पूरपरिस्थितीदरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून नवसंजीवन योजनेची अंमलबजावणी केल्या जात आहे. अतवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील ६ अतिदुर्गम तालुके प्रभावित होत असतात. यात धानोरा, मुलचेरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी आदींचा समावेश आहे. या तालुक्यातील एकूण २८२ गावांचा नवसंजीवन योजनेत समावेश आहे. या गावातील नागरिकांना १२३ स्वस्त धान्य दुकानातून जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचविले जात आहे. नवसंजीवन योजनेंतर्गत धानोरा तालुक्यातील १४, मुलचेरा ३, अहेरी ८९, सिरोंचा ४३, एटापल्ली ७0 व भामरागड तालुक्यातील ६३ अशा एकूण २८२ गावातील एपीएल, बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना एकूण १९ हजार ९६६ क्विंटल धान्य लागणार आहे.  धान्य पुरविण्याच्या कामाला वेग आला असून आतापर्यंत ७५ टक्के गावांना धान्य पोहोचले असल्याची माहिती आहे. उर्वरित गावांमध्ये ३१ मेपर्यंत चार महिन्याच्या कालावधीचे धान्य पोहोचणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून मिळाली आहे. संपर्क तुटणार्‍या गावातील नागरिक स्वत धान्य दुकानातून धान्याची उचल करीत आहेत.