शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

२७० घरकूल मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 7, 2014 23:56 IST

शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जाहिरात देऊन लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागितले. सदर प्रस्तावांची छाणणी करून मंजुरीसाठी

शबरी घरकूल योजना : राज्य सरकारचा निधी अप्राप्तदिलीप दहेलकर - गडचिरोलीशबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने जाहिरात देऊन लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागितले. सदर प्रस्तावांची छाणणी करून मंजुरीसाठी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविले. मात्र आयुक्त कार्यालयाची मंजुरी न मिळाल्यामुळे गडचिरोली प्रकल्पातील एकूण २७० घरकूल रखडले असल्याची माहिती आहे. आदिवासी विकास विभाग २८ मार्च २०१३ रोजी शासन निर्णय काढून आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी नागरिकांसाठी ७० हजार रूपयाचे घरकूल तर नगर पालिका क्षेत्रासाठी दीड लाख रूपये किंमतीचे घरकूल देण्याची तरतूद शासन निर्णयात नमूद आहे.वरिष्ठांच्या निर्देशानुसार गडचिरोली प्रकल्प कार्यालयाने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कारवाई सुरू केली. गडचिरोली प्रकल्पातील ग्रामीण क्षेत्रातील घरकुलांसाठी १ हजार प्रस्ताव प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाले. कार्यालयामार्फत आलेल्या प्रस्तावांची छाणनी करून २७० घरकुलांचे प्रस्ताव आदिवासी आयुक्त कार्यालय व राज्य शासनाकडे सादर करण्यात आले. याच दरम्यान माडीया आदी संरक्षण तथा विकास कार्याक्रमांतर्गत केंद्र शासनाने आदिवासी नागरिकांसाठी १ लाख रूपये किंमतीची घरकूल योजना कार्यान्वित केली. त्यानंतर ६ जून २०१३ रोजी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांचे प्रकल्प कार्यालयाला पत्र प्राप्त झाले. केंद्र शासनाची घरकूल योजना ७० हजार रूपयाच्या किंमतीनुसार राबविण्याचे निर्देश आयुक्तांनी या पत्रान्वये प्रकल्प कार्यालयाला दिले. केंद्र शासनाकडून माडीया आदिम जमातीच्या घरकुलांसाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाला १ कोटी ८९ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. केंद्र शासनाने या निधीतून प्रकल्प कार्यालयाला १७९ घरकुलांचे उद्दीष्ट दिले होते. मात्र आयुक्तांच्या पत्रानुसार कारवाई करून प्रकल्प कार्यालयांनी ७० हजार रूपयाच्या किंमतीप्रमाणे २७० घरकुलांचे प्रस्ताव राज्य शासन व आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव सादर केले. प्रस्तावात घेण्यात आलेल्या २७० घरकुलांमध्ये चामोर्शी, गडचिरोली व धानोरा या तीन तालुक्यातील घरकुलांचा समावेश आहे. माडीया, आदिम जमातीच्या घरकुलांसाठी केंद्र सरकारचा निधी प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाला आहे. मात्र राज्य शासनाकडून शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी अद्यापही निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. ग्रामविकास विभागाची इंदिरा आवास योजना व सामाजिक न्याय विभागाची रमाई घरकूल योजनेत एक व दीड लाख रूपये किंमतीच्या रूपयातून घरकूल बांधून देण्यात येते. मात्र आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी घरकूल योजनेत ७० हजार रूपये किंमतीच्या घरकुलांचा समावेश आहे. वाढत्या महागाईच्या काळात केवळ ७० हजार रूपयामध्ये घरकूल कसे पूर्ण करायचे असा प्रश्न अर्ज सादर केलेल्या आदिवासी लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.