शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

२६९ गावांना धान्य पुरवठा

By admin | Updated: June 6, 2017 00:53 IST

जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो.

पुरवठा विभागाचे नियोजन : पावसाळ्यात चार महिन्यांसाठी सोयलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी शासनाने सुरुवात केली असून पावसाळ्यातील चार महिन्याचा धान्यसाठा पोहोचविला जात आहे. २०१७-२०१८ करिता नवसंजीवन योजनेत येत असलेल्या जिल्ह्यातील धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या सहा तालुक्यातील पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या २६९ गावांना १४३ रास्तभाव दुकानामार्फत जून ते सप्टेंबर २०१७ या चार महिन्यांचे अन्नधान्य शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्यात येणार आहे. जून २०१७ च्या वितरणाकरिता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (केवळ बीपीएल व अंत्योदय) जून २०१७ करिता साखरेचे मासिक नियतन मंजूर करण्यात आलेले आहे. नव संजीवन योजना लागू असलेले तालुके वगळता गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यांना तसेच नव संजीवन योजना लागू असलेल्या धानोरा, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या तालुक्यातील नव संजीवन योजना लागू नसलेल्या गावामधील (२६९ गावे) प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना (लाभार्थ्यांना) गोदामातील उपलब्धतेनुसार जून २०१७ करिता प्राधान्य कुटुंब लाभार्थी, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी व पिवळ्या शिधापत्रिकांना वाटप परिमाण निर्धारित करण्यात येत आहे. त्याप्रमाणे अन्नधान्य व साखरेचे वितरण शिधापत्रिकाधारकांना करण्यात यावे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रशानाच्या वतीने हालचाली सुरू करण्यात आले आहेत.दुर्गम गावात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही साठवणूकदुर्गम गावात रस्ते व पुलाचा अभाव असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नसतात. जवळपास चार महिने संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या भागातील नागरिक पावसाळ्याच्या सुरुवातीलाच दैनंदिन गरजेच्या वस्तूंची साठवणूक करतात. तालुका अथवा केंद्रातील गावातून चार महिने पुरेल एवढी वस्तू खरेदी करतात.