शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

२६९२ बालके कमी वजनाची

By admin | Updated: March 7, 2017 00:45 IST

जिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यातील जवळपास दोन हजार अंगणवाडी केंद्रांतर्गत बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणाच्या अहवालात उघड : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या कायमदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या बाल कल्याण विभागामार्फत बाराही तालुक्यातील जवळपास दोन हजार अंगणवाडी केंद्रांतर्गत बालकांचे वजन घेऊन कुपोषणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल २ हजार ६९२ बालके कमी वजनाची आढळून आली. सदर धक्कादायक माहिती जानेवारी २०१७ च्या अहवालात उघड झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या पुढाकाराने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना गतवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गरोदर व स्तनदा माताना एकवेळ चौरस आहार दिला जातो. याशिवाय सदर योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना केळी, अंडी व इतर फळांचा लाभ दिला जातो. सदर योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील कुपोषणाची तीव्रता झपाट्याने कमी करण्यात प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही यश आल्याचे दिसून येत नाही. बाराही तालुक्यातील ८० हजार ३२३ इतक्या शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १२ हजार ६६ बालके मध्यम कमी वजनाची आढळून आली. तर २ हजार ६९२ बालके तीव्र कमी वजनाची आढळून आली. तीव्र कमी वजनाच्या बालकांची गडचिरोली जिल्ह्यातील टक्केवारी ३.३५ आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील २००, आरमोरी २६७, भामरागड २५७, चामोर्शी ४००, देसाईगंज ११३, धानोरा १९८, एटापल्ली २७२, गडचिरोली २७३, कोरची १६९, कुरखेडा २०७, मुलचेरा १४४ व सिरोंचा तालुक्यातील १९२ बालके कमी वजनाची आहेत. कुपोषणाचे सर्वेक्षण मॅम व सॅम या दोन प्रकारात केले जाते. सॅम प्रकारातील बालके अधिक कमी वजनाचे राहत असून यांच्या आहार व आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानंतरच सदर बालके कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर येतात. ८० हजार ३२३ बालकांचे वजन घेण्यात आले. १७७ बालकांची उंची कमीवजन व उंचीनुसार सर्वेक्षण केले जाते. शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील एकूण १ हजार ८९ बालकांचे उंचीनुसार सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ९१२ बालकांची उंची वयानुसार योग्यरित्या आढळून आली. मात्र १७७ बालकांचे उंची कमी असल्याचे जानेवारी २०१७ च्या अहवालात नमूद आहे. कुपोषणाचे प्रमाण भामरागडात अधिकभामरागड या नक्षलप्रभावित अतिदुर्गम तालुक्यात कमी वजनाचे म्हणजे, कुपोषीत बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ७ टक्के बालकांचे वजन या तालुक्यात कमी आहे. उंचीनुसार कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी २.४८ तर डब्ल्यूएचओनुसार २३.११ टक्के बालके कुपोषीत आहेत.