शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

२३ हजार लिटर दूध उत्पादन वाढले

By admin | Updated: February 28, 2015 01:32 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील २२२ गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविली.

लोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील २२२ गावांमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात वर्षभरात २३ हजार २३६ लिटर दूध उत्पादन वाढले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे कामधेनू दत्तक ग्राम योजना पशुपालकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने गतवर्षी २०१३-१४ मध्ये जिल्हाभरात २२२ गावांची निवड करण्यात आली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १५, चामोर्शी तालुक्यातील ३५, मुलचेरा तालुक्यातील १२, कुरखेडा तालुक्यातील १५, देसाईगंज तालुक्यातील ६, सिरोंचा १५, कोरची १०, आरमोरी १७, एटापल्ली ३२, धानोरा २०, भामरागड १० व अहेरी तालुक्यातील ३५ गावांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाने पशुवैैद्यकीय संस्थेंतर्गत निवड केलेल्या २२२ गावांमध्ये शिबिर आयोजित करून कामधेनू योजनेची माहिती पशुपालकांना दिली. याशिवाय या गावांमध्ये पशुपालकांसाठी शैक्षणिक सहल, गावातील पशुधनाची अद्यावत पशुगणना, गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना, गामस्तरावर विशेष ग्रामसभा, जंतानाशक शिबिर, गोचीड गोमाशा निर्मूलन शिबिर, रोगप्रतिबंधक लसीकरण शिबिर, खनिजद्रव्य मिश्रण व जीवनसत्वाचा पुरवठा, वंधत्व निवारण व औषधोपचार शिबिर, निकृष्ट चारा सकस करण्याचे प्रात्यक्षिक, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन आणि वैरण विकास आदी उपक्रम राबविले. यातून २२२ गावांमधील पशुधनाचा विकास करण्यात यश आल्याचा दावा जि.प. पशुसंवर्धन विभागाने केला आहे.यंदा योजनेसाठी ११२ गावांची निवडकामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी यंदा २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ११२ गावांची निवड करण्यात आली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ९८ गावांमध्ये पशुपालक मंडळाची स्थापना करण्यात आली असून १०५ गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करून कामधेनू दत्तक योजनेची जनजागृती करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत ११२ गावांमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले. यंदा या योजनेसाठी ३२० लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली असून १९२ लक्ष रूपये प्राप्त झाले असून यापैकी १५६.२३ लक्ष रूपये खर्च झाले. खर्चाची टक्केवारी ८१.३७ आहे.अशी झाली दूध उत्पादनात वाढकामधेनू दत्त ग्राम योजनेंतर्गत २०१३-१४ या वर्षी निवड केलेल्या २२२ गावातील जनावरांवर औषधोपचार करण्यात आले. वंधत्व निवारणासाठी या गावातील जनावरांवर विशेष उपचार करण्यात आला. उपचार केलेल्या ५८ हजार ८३० जनावरांपैकी २६ हजार ४७४ जनावरे गाभण राहिली. १०२२.३० हेक्टर क्षेत्र चारा लागवडीखाली आणण्यात आले असून १ लाख ३२ हजार ६४८ क्विंटल इतकी हिरवी वैरण उपलब्ध झाली. या चाऱ्याचा उपयोग जनावरांसाठी झाला. यातून गाभण राहिलेल्या जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ झाली. सदर योजना राबविण्यापूर्वी या २२२ गावांमधील दुभत्या जनावरांकडून ७७ हजार ७३ लिटर दूध उत्पादन मिळाले. योजना राबविल्यानंतर याच गावातील जनावरांकडून १ लाख ३०९ लिटर दूध उत्पादन होऊन वर्षभरात २३ हजार २३६ लिटर दुुधाची भर पडली.