कुरखेडा : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेचे संस्थापक गो. ना. मुनघाटे यांच्या जयंतीप्रित्यर्थ स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्या रासेयो विभाग व उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरादरम्यान २० विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी उपप्राचार्य पी. एस. खोपे, रक्तसंक्रमन अधिकारी डॉ. शैलेजा मैदमवार, प्रा. डॉ. दशरथ आदे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात राकेश भांडारकर, भूषण बुद्धे, योगेश नंदनवार, रोशन शेख, चंद्रदीपक बन्सोड, हेमलता दोनाडकर, दीक्षा बालपांडे, धनराज कोरामी, संदीप बुराडे, कालिदास नाकाडे, नरेश मडावी, लतीश मानकर, मनीष येवले, राहुल गिरडकर, निकेश गायकवाड, दिनेश गोन्नाडे, अमर बन्सोड, प्रा. सपना तितीरमारे, प्रा. डॉ. दीपक बन्सोड, उषा गोनाडे यांनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी प्रा. अमित रामटेके, राणी बुद्धे, मिलींद प्रधान, प्रा. डॉ. विवेक मुरकुटे, प्रा. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. भोयर, प्रा. उराडे, प्रा. वाकडे, डॉ. विखार यांनी सहकार्य केले.
कुरखेडा येथे २० विद्यार्थ्यांनी केले रक्तदान
By admin | Updated: January 15, 2016 02:21 IST