शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माडेमूल जंगल परिसरातून २० क्विंटल मोहसडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:33 IST

गडचिरोली : तालुक्यातील माडेमूल- रानमूल जंगल परिसरातील नदीकाठी असलेले दारूचे अड्डे उद्‌ध्वस्त केले आहे. सोबतच १० ठिकाणावरून मिळालेला १ ...

गडचिरोली : तालुक्यातील माडेमूल- रानमूल जंगल परिसरातील नदीकाठी असलेले दारूचे अड्डे उद्‌ध्वस्त केले आहे. सोबतच १० ठिकाणावरून मिळालेला १ लाख २० हजार रुपये किमतीचा २० क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट करण्यात आली. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या ही कारवाई केल्याने दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान करण्यात यश आले आहे.

माडेमूल- रानमूल या गावांच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयासह तालुक्यात व चामोर्शी तालुक्यातील इतर गावांतसुद्धा दारू पुरविली जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. झगडे-भांडणांचे प्रमाण अधिक झाले आहे. याबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या माडेमूल- रानमूल जंगल परिसरात अहिंसक कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार जंगलपरिसरात शोधमोहीम राबवत दारू अड्डे उद्‌ध्वस्त केले. विविध ठिकाणी टाकलेला १ लक्ष २० हजार रुपये किमतीचा २० क्विंटल मोहसडवा व दारू गाळण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. यामुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या आदेशाने ॲक्शन प्लॅननुसार तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यानुसार तालुक्यातील मुजोर गावातील दारू विक्रेत्यांविरोधात गडचिरोली पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. अलोनी, चांदाळा, माडेमूल-रानमूल येथे केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील दारू विक्रेते धास्तावले आहेत. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. गोपाले, हवालदार शिवदास दुर्गे, चंद्रभान मडावी, लोणारे, जेंगठे, लोणारकर, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकूडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.

फोटो ओळ - मोहसडवा नष्ट करताना पोलीस व मुक्तिपथ चमू